IND vs ENG, 4th T2O : ईजा, बीजा, तिजा...!;  लोकेश राहुलचा अपयशाचा पाढा कायम, विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम

IND vs ENG, 4th T2O : १, ०, ० व १४ अशी राहुलची या मालिकेतील कामगिरी राहिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 07:57 PM2021-03-18T19:57:42+5:302021-03-18T20:02:32+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 4th T2O : Team India lost three wickets, Poor run of KL Rahul continues, first time Virat Kohli got stumped in T20Is  | IND vs ENG, 4th T2O : ईजा, बीजा, तिजा...!;  लोकेश राहुलचा अपयशाचा पाढा कायम, विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम

IND vs ENG, 4th T2O : ईजा, बीजा, तिजा...!;  लोकेश राहुलचा अपयशाचा पाढा कायम, विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 4th T20 Live Update Score : चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यातही नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं लागला आणि त्यांनी टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरवले. सातत्यान अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला ( KL Rahul) कर्णधार विराट कोहलीन संघात कायम ठेवले, परंतु त्यानं पुन्हा निराश केलं. रोहितनं आदिल राशिदनं टाकलेल्या पहिल्याच षटकात खणखणीत षटकार व चौकार मारून टीम इंडियाला दणक्यात सुरुवात करून दिली. पण, याही सामन्यात तो मोठी खेळी करू शकला नाही. लोकेश राहुलही अपयशी ठरला आणि त्यामागोमाग विराट कोहलीनंही ( Virat Kohli) घरचा रस्ता धरला.  Ind Vs Eng 4th T20, Ind Vs Eng 4th T20 Live Score

रोहितनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ९००० धावांचा पल्ला पार केला. विराट कोहलीनंतर ट्वेंटी-20त ९००० धावा करणारा तो पहिलाच भारतीय आहे.  शिवाय ट्वेंटी-२०त ५० षटकार पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाजाचा मानही त्यानं पटकावला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पहिल्या चेंडूवर षटकार खेचणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. जोफ्रा आर्चरनं चौथ्या षटकात स्वतःच्याच गोलंदाजीवर रोहितचा सुरेख रिटर्न कॅच टिपला. रोहितनं १२ चेंडूंत १२ धावा केल्या. Ind Vs Eng T20 Match Today आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवनं रचला इतिहास, Video

त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) पहिल्याच चेंडूवर नटराजन शॉट खेळून षटकार खेचला. सूर्यानं दमदार खेळ करताना इंग्लंडच्या गोलंदाजांवर आक्रमण सुरू केलं. लोकेश राहुल आज मोठी खेळी करेल, असे वाटत असतानाच माशी शिंकली. बेन स्टोक्सनं त्याला १४ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. १, ०, ० व १४ अशी राहुलची या मालिकेतील कामगिरी राहिली. विराटला आदिल राशिदच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याचा मोह आवरता आला नाही आणि तो यष्टिचीत झाला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये विराट ( १) प्रथमच स्टम्पिंग झाला. ( first time Virat Kohli got stumped in T20Is ) भारताचे तीन फलंदाज ७० धावांवर माघारी परतले आहेत. Ind Vs Eng T20 Live Match  पहिल्या षटकात षटकार अन् चौकार; रोहित शर्मानं मारला मोठ्या पराक्रमाचा षटकार

विराट कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज 
१० - टीम साऊदी
८ - आदिल राशिद
८ - बेन स्टोक्स
८ - मोईन अली
८ - जेम्स अँडरसन 
८ - ग्र‌ॅमी स्वान
 

Web Title: IND vs ENG, 4th T2O : Team India lost three wickets, Poor run of KL Rahul continues, first time Virat Kohli got stumped in T20Is 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.