India vs England 4th test Live : रोहित शर्माचे अर्धशतक, टीम इंडियाची मजबूत आघाडीच्या दिशेनं वाटचाल!

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी पहिल्या ...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 06:46 PM2021-09-04T18:46:52+5:302021-09-04T18:47:18+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: Cheteshwar Pujara rolls his ankle over, Rohit Sharma crosses 1k runs in international cricket in 2021 | India vs England 4th test Live : रोहित शर्माचे अर्धशतक, टीम इंडियाची मजबूत आघाडीच्या दिशेनं वाटचाल!

India vs England 4th test Live : रोहित शर्माचे अर्धशतक, टीम इंडियाची मजबूत आघाडीच्या दिशेनं वाटचाल!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : लोकेश राहुलरोहित शर्मा यांनी पहिल्या डावातील पिछाडी भरून काढताना टीम इंडियाला दुसऱ्या डावात ८३ धावांची सलामी दिली. भारताचा पहिला डाव १९१ धावांवर गुंडाळल्यानंतर इंग्लंडनं २९० धावा करून पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात रोहित व लोकेश यांनी दुसऱ्या डावात दमदार खेळ केला. पण, ३९ वर्षीय जेम्स अँडरसननं ही भागीदारी तोडली. लोकेशला ४६ धावांवर माघारी परतला. रोहितनं १४६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं, या मालिकेतील त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले आणि २०२१मध्ये १००० धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.  india vs england 4th test, india vs england 4th test live

भारताची सेट जोडी तुटली, जेम्स अँडरसननं सलामीवीर लोकेश राहुलला पाठवलं माघारी, Video


लोकेश राहुल व रोहित यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनीही कोणताच धोका न पत्करता संयमानं खेळ केला. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटके मारण्याचा मोह त्यांनी कटाक्षानं टाळला अन् हेच त्यांच्या यशस्वी भागीदारीचे गमक ठरले. रोरी बर्न्सनं दिलेल्या दोन जीवदानांचा पुरेपूर फायदा रोहितनं उचलला. लोकेशही अर्धशतकानजीक होता, परंतु इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसननं ही भागीदारी तोडली. अँडरसनचा इनस्वींग चेंडू लोकेशच्या बॅटची हलकीशी किनार घेत यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. लोकेश ४६ धावांवर माघारी परतला. india vs england 4th test live score, india vs england 4th test scorecard
 

रोहितनं त्यानंतर चेतेश्वर पुजारासह संयमी खेळ सुरूच ठेवला. या दोघांनीही चांगली भागादी करताना टीम इंडियाची आघाडी आणखी वाढवली. रोहितनं या मालिकेतील तिसरे अर्धशतक पूर्ण करताना इंग्लंड दौऱ्यावर एकाच कसोटी मालिकेत तीन अर्धशतक करणाऱ्या मुरली विजय ( २०१४) व दिनेश कार्तिक ( २००७) यांच्याशी बरोबरी केली. दरम्यान, एक धाव घेताना पुजाराचा पाय मुरगळला अन् त्याला होत असलेल्या प्रचंड वेदना चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होता. प्राथमिक उपचार घेत पुन्हा मैदानावर उभा राहिला आणि काही सुरेख चौकारही खेचले. india vs england 4th test live udates, ind vs eng live test match

Neearaj Chopra : नीरज चोप्राला विचारला गेला 'Sex Life' बद्दल प्रश्न; आणि मग सोशल मीडियावर...

ओली पोप व ख्रिस वोक्सनं इंग्लंडचा दिला आधार...
चौथ्या कसोटीत इंग्लंडच्या ओली पोप व ख्रिस वोक्स यांनी टीम इंडियाचे कंबरडे मोडले. दुसऱ्या दिवशी ५ बाद ६२ अशा दयनीय अवस्थेत असलेल्या इंग्लंडसाठी पोव व जॉनी बेअरस्टो ही जोडी धावून आली. त्यानंतर पोपनं चतूर खेळ केला. वोक्सनं अखेरच्या विकेटसाठी तुफान फटकेबाजी करताना इंग्लंडला पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी मिळवून दिली. इंग्लंडनं पहिल्या डावात २९० धावा केल्या. उमेश यादवनं सर्वाधिक ३, तर रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.  ind vs eng live score, ind vs eng live score

Web Title: Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: Cheteshwar Pujara rolls his ankle over, Rohit Sharma crosses 1k runs in international cricket in 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.