India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी पहिल्या डावातील पिछाडी भरून काढताना टीम इंडियाला दुसऱ्या डावात ८३ धावांची सलामी दिली. भारताचा पहिला डाव १९१ धावांवर गुंडाळल्यानंतर इंग्लंडनं २९० धावा करून पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात रोहित व लोकेश यांनी दुसऱ्या डावात दमदार खेळ केला. पण, ३९ वर्षीय जेम्स अँडरसननं ही भागीदारी तोडली. लोकेशला ४६ धावांवर माघारी परतला. रोहितनं १४६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं, या मालिकेतील त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले आणि २०२१मध्ये १००० धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. india vs england 4th test, india vs england 4th test live
भारताची सेट जोडी तुटली, जेम्स अँडरसननं सलामीवीर लोकेश राहुलला पाठवलं माघारी, Video
रोहितनं त्यानंतर चेतेश्वर पुजारासह संयमी खेळ सुरूच ठेवला. या दोघांनीही चांगली भागादी करताना टीम इंडियाची आघाडी आणखी वाढवली. रोहितनं या मालिकेतील तिसरे अर्धशतक पूर्ण करताना इंग्लंड दौऱ्यावर एकाच कसोटी मालिकेत तीन अर्धशतक करणाऱ्या मुरली विजय ( २०१४) व दिनेश कार्तिक ( २००७) यांच्याशी बरोबरी केली. दरम्यान, एक धाव घेताना पुजाराचा पाय मुरगळला अन् त्याला होत असलेल्या प्रचंड वेदना चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होता. प्राथमिक उपचार घेत पुन्हा मैदानावर उभा राहिला आणि काही सुरेख चौकारही खेचले. india vs england 4th test live udates, ind vs eng live test match
Neearaj Chopra : नीरज चोप्राला विचारला गेला 'Sex Life' बद्दल प्रश्न; आणि मग सोशल मीडियावर...
ओली पोप व ख्रिस वोक्सनं इंग्लंडचा दिला आधार...चौथ्या कसोटीत इंग्लंडच्या ओली पोप व ख्रिस वोक्स यांनी टीम इंडियाचे कंबरडे मोडले. दुसऱ्या दिवशी ५ बाद ६२ अशा दयनीय अवस्थेत असलेल्या इंग्लंडसाठी पोव व जॉनी बेअरस्टो ही जोडी धावून आली. त्यानंतर पोपनं चतूर खेळ केला. वोक्सनं अखेरच्या विकेटसाठी तुफान फटकेबाजी करताना इंग्लंडला पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी मिळवून दिली. इंग्लंडनं पहिल्या डावात २९० धावा केल्या. उमेश यादवनं सर्वाधिक ३, तर रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ind vs eng live score, ind vs eng live score