Join us  

India vs England 4th test Live : रिषभ पंतला बाद करण्याची चालून आलेली संधी इंग्लंडनं गमावली, मोठी फजिती झाली Video 

Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: चौथ्या दिवशी पहिल्या अर्ध्यातासाच्या खेळात विराटनं सुरेख फटके मारले. जडेजाही सेट झालाय असे वाटत होते, परंतु वोक्सनं त्याला पायचीत पकडले. जडेजा १७ धावांवर माघारी परतला. अजिंक्य रहाणेही भोपळ्यावर पायचीत झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 7:43 PM

Open in App

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांनी उभ्या केलेल्या भक्कम पायावर टीम इंडियाच्या अन्य शिलेदारांनी मजबूत धावसंख्या उभारली. विराट कोहलीला पुन्हा एकदा तिहेरी धावसंख्या गाठता आली नाही. पण, रिषभ पंत व शार्दूल ठाकूर यांच्या फटकेबाजीनं इंग्लंडला हैराण केलं. ही जोडी तोडण्याची आयती संधी चालून आली होती, परंतु मैदानावर कॉमेडी शो रंगला अन् विराट कोहलीही खदखदून हसू लागला.

रवी शास्त्रींचा कोरोना रिपोर्ट आला पॉझिटिव्ह अन् आता लोकेश राहुलवर ओढावलं संकट!

चौथ्या दिवशी पहिल्या अर्ध्यातासाच्या खेळात विराटनं सुरेख फटके मारले. जडेजाही सेट झालाय असे वाटत होते, परंतु वोक्सनं त्याला पायचीत पकडले. जडेजा १७ धावांवर माघारी परतला. अजिंक्य रहाणेही भोपळ्यावर पायचीत झाला. तो मागील २७ कसोटी डावांमध्ये ३ वेळा भोपळ्यावर माघारी परतला, तर दोन अर्धशतकं व एक शतक झळकावलं.   विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी ५९ धावांची भागादारी करून टीम इंडियाच्या आघाडीत भर टाकली.  ख्रिस वोक्सनं दोन मोठे धक्के देऊन इंग्लंडला कमबॅकचे स्वप्न दाखवले. विराट चांगल्या टचमध्ये दिसत होता, परंतु फिरकीपटू मोईन अलीनं त्याला बाद केले.  

रिषभ पंत व शार्दूल ठाकूर यांनी दमदार खेळी करताना अर्धशतकी भागीदारी केली. रिषभपेक्षा शार्दूलचा खेळ अधिक आक्रमक होता. ही जोडी तोडण्याची आयती संधी इंग्लंडला मिळाली होती. रिषभ पंत व शार्दूल यांच्यातला ताळमेळ चुकला अन् मोईन अलीनं धावबाद करण्याची सोपी संधी गमावली. इंग्लंडच्या खेळाडूंचा हा गोंधळ पाहून विराट कोहलीला हसू आवरले नाही. ( Chance! A mix-up in the middle but Moeen's throw is wide... he had a lot more time there to throw it to Bairstow or run closer to the stumps) . 

शार्दूलनं ६५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ८व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन दोन्ही डावांत अर्धशतक करणारा शार्दूल हा सहवा आणि भारताचा तिसरा खेळाडू ठरला. भारताकडून यापूर्वी हरभजन सिंग व वृद्धीमान सहा यांनी हा पराक्रम केला आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरिषभ पंतशार्दुल ठाकूर
Open in App