India vs England 4th test Live : 'लॉर्ड' शार्दूल पावला, टीम इंडियासाठी धावला; विराट अँड कंपनीनं इतिहास रचला!

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : पाचव्या दिवसाच्या सत्रात ड्रायव्हर सीटवर बसलेल्या इंग्लंडला लंच ब्रेकनंतर टीम इंडियानं भिरकावून लावले.  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 09:13 PM2021-09-06T21:13:38+5:302021-09-06T21:17:07+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 4th Test 2021 Live updates:  History! India win their first Test at Oval since 1971, take 2-1 lead in the series. | India vs England 4th test Live : 'लॉर्ड' शार्दूल पावला, टीम इंडियासाठी धावला; विराट अँड कंपनीनं इतिहास रचला!

India vs England 4th test Live : 'लॉर्ड' शार्दूल पावला, टीम इंडियासाठी धावला; विराट अँड कंपनीनं इतिहास रचला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देपहिल्या डावात शार्दूल ठाकूरच्या ५७ धावा महत्त्वपूर्ण ठरल्या. त्यामुळेच टीम इंडियानं १९१ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या डावात रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी चांगली सुरूवात करून दिल्यानंतर चेतेश्वर पुजारा व विराट कोहली यांनी चांगली साथ दिली.रोहित शर्माचे शतक अन् शार्दूल ठाकूर व रिषभ पंत यांचे अर्धशतक हे दुसऱ्या डावातील महत्त्वाचे टप्पे ठरले. त्यांच्या जोरावर टीम इंडियानं तगडे आव्हान ठेवले.पाचव्या दिवसाच्या लंच ब्रेकनंतर रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांनी डाव पलटवला. शार्दूलन इंग्लंडचा कर्णधार जो रूटची विकेट घेत भारताचा विजय पक्का केला.

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : पाचव्या दिवसाच्या सत्रात ड्रायव्हर सीटवर बसलेल्या इंग्लंडला लंच ब्रेकनंतर टीम इंडियानं भिरकावून लावले.  रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह या जोडीनं ६ धावांत इंग्लंडचे चार फलंदाज माघारी पाठवले. त्यामुळे एकवेळ २ बाद १४१ अशा सुस्थितित असलेला इंग्लंडचा डाव ६ बाद १४७ असा गडगडला. हा सामना ड्रॉ करण्याचा इंग्लंडचा मानस भारतीय गोलंदाजांनी डळमळीत केला.  तळाच्या चार फलंदाजांना सोबत घेऊन ५४ षटकं खेळून काढणं हे अवघडच होतं, तरीही कर्णधार जो रूटनं १३ षटकं खेळली. पण, शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) त्याचा त्रिफळा उडवून टीम इंडियाचा विजय पक्का केला. शार्दूलनं दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी केली शिवाय गोलंदाजीतही योगदान दिले. इंग्लंड व ऑस्ट्रेलियात एकापेक्षा अधिक कसोटी जिंकणारा विराट कोहली हा आशियातील पहिला कर्णधार ठरला. ( Virat Kohli becomes the first Asian captain to win more than one Test match both in Australia and England.) 


भारतीय संघानं दुसऱ्या डावात ४६६ धावा करताना विजयासाठी ठेवलेल्या ३६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी केली. शार्दूल ठाकूरनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. शार्दूल ठाकूरनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. रोरी बर्न्स १२५ चेंडूंत ५ चौकारांसह ५० धावा करून माघारी परतला. त्यानंतर डेवीड मलानसाठी DRS घेतला गेला,  परंतु अम्पायर्स कॉलमुळे तो वाचला. त्याला या जीवदानाचा फायदा उचलता आला नाही आणि पुढील षटकात तो माघारी परतला. लंच ब्रेकनंतर सर्व काही बदलले. रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांनी इंग्लंडला चार मोठे धक्के दिले. india vs england 4th test, india vs england 4th test live


हमीद ५५ धावांवर असताना रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजनं त्याचा सोपा झेल सोडला.  मात्र, लंच ब्रेकनंतर जडेजानं अप्रतिम चेंडूवर हमीदचा त्रिफळा उडवला. हमीद १९३ चेंडूंत ६३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर जसप्रीतनं कमाल केली. त्यानं ओली पोप व जॉनी बेअरस्टो यांना झटपट माघारी पाठवले. जसप्रीत बुमराहनं कसोटीत १०० विकेट्स घेण्याचा विक्रम केला. त्यानं २४ डावांमध्ये १०० विकेट्स घेत कपिल देव यांचा ( २५ डाव) विक्रम मोडला. विजय आणि टीम इंडिया यांच्या मार्गात इंग्लंडचा कर्णधार जो रूट हा उभा होता. पण, तोही दुर्देवीरित्या बाद झाला. शार्दूलनं टाकलेला चेंडू पॉईंटच्या दिशेनं मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् चेंडू बॅटला लागून यष्टिंवर आदळला. रूट ( ३६)  बाद झाल्यानं इंग्लंडसमोरील अडचणी आणखी वाढल्या. india vs england 4th test scorecard, india vs england 4th test live udates

 


रूट बाद झाला तेव्हा पाचव्या दिवसाची ४० षटकं फेकली जाणं बाकी होतं अन् इंग्लंडची ७ बाद १८२ अशी दयनीय अवस्था झाली होती. उमेश यादवनं भारताच्या मार्गातील अखेरचा अडथळा ख्रिस वोक्स ( १८) याला बाद केले आणि आता फक्त शेपूट उरले होते. उमेशनं आणखी एक विकेट घेत क्रेग ओव्हर्टनला ( १०) माघारी पाठवले. अखेरची विकेटही त्यानंच घेतली. इंग्लंडचा दुसरा डाव २१० धावांवर गडगडला अन् टीम इंडियानं १५७ धावांनी बाजी मारून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.  १९७१नंतर ओव्हलवर भारताचा हा पहिलाच विजय ठरला. 

Read in English

Web Title: Ind vs Eng 4th Test 2021 Live updates:  History! India win their first Test at Oval since 1971, take 2-1 lead in the series.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.