India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांनी उभ्या केलेल्या भक्कम पायावर टीम इंडियाच्या अन्य शिलेदारांनी मजबूत धावसंख्या उभारली. विराट कोहलीला पुन्हा एकदा तिहेरी धावसंख्या गाठता आली नाही. पण, रिषभ पंत व शार्दूल ठाकूर यांच्या फटकेबाजीनं इंग्लंडला हैराण केलं. ही जोडी तोडण्याची आयती संधी चालून आली होती, परंतु मैदानावर कॉमेडी शो रंगला अन् विराट कोहलीही खदखदून हसू लागला. या जोडीनं सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून टीम इंडियाला मोठी आघाडी मिळवून दिली. टीम इंडियानं दुसऱ्या डावात एवढी मोठी आघाडी घेतलीय की त्यांना पराभूत करणं आता अशक्यच आहे.
रिषभ पंत व शार्दूल ठाकूर यांनी दमदार खेळी करताना अर्धशतकी भागीदारी केली. रिषभपेक्षा शार्दूलचा खेळ अधिक आक्रमक होता. ही जोडी तोडण्याची आयती संधी इंग्लंडला मिळाली होती. रिषभ पंत व शार्दूल यांच्यातला ताळमेळ चुकला अन् मोईन अलीनं धावबाद करण्याची सोपी संधी गमावली. इंग्लंडच्या खेळाडूंचा हा गोंधळ पाहून विराट कोहलीला हसू आवरले नाही. शार्दूलनं ६५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ८व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन दोन्ही डावांत अर्धशतक करणारा शार्दूल हा सहवा आणि भारताचा तिसरा खेळाडू ठरला. भारताकडून यापूर्वी हरभजन सिंग व वृद्धीमान सहा यांनी हा पराक्रम केला आहे. india vs england 4th test live score, india vs england 4th test scorecard
- इंग्लंडनं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चौथ्या डावात केवळ दोन वेळाच ३१६+ धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. २०१९मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लिड्स कसोटीत ९ बाद ३६२ धावा केल्या होत्या, तर त्याआधी १९२९साली मेलबर्नवर ७ बाद ३३२ धावा केल्या होत्या. ( England's highest successful run chase in Test cricket is 359 came against Australia at Headingly in 2019.)
- इंग्लंडमधील कसोटी सामन्यातील भारताची ही तिसऱ्या डावातील दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. १९६७मध्ये भारतानं लिड्स येथे झालेल्या कसोटीत फॉलोऑन स्वीकारल्यानंतर १० बाद ५१० धावा केल्या होत्या आणि भारताला तो सामना गमवावा लागला होता. भारताविरुद्ध आतापर्यंत एकही संघाला चौथ्या डावात ३४५+ धावांचा यशस्वी पाठलाग करता आलेला नाही.