India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारतीय संघानं दुसऱ्या डावात ४६६ धावा करताना विजयासाठी ठेवलेल्या ३६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी केली. शार्दूल ठाकूरनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर डेवीड मलानसाठी DRS घेतला गेला, परंतु अम्पायर्स कॉलमुळे तो वाचला. त्याला या जीवदानाचा फायदा उचलता आला नाही आणि पुढील षटकात तो माघारी परतला. लंच ब्रेकपर्यंत इंग्लंड हा सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवेल असेच चित्र होते, परंतु ब्रेकनंतर सर्व काही बदलले. रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांनी इंग्लंडला तीन मोठे धक्के दिले. बुमराहनं भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडला.
जोरदार अपील, विराट कोहलीचा DRS अन् अम्पायरमुळे इंग्लंडच्या फलंदाजाला जीवदान, पण...
भारताविरुद्ध आतापर्यंत कोणत्याच संघाला चौथ्या डावात एवढे मोठे लक्ष्य पार करता आलेले नाही. पण, फलंदाजांसाठी पोषक बनलेल्य़ा खेळपट्टीवर इंग्लंडचे सलामावीर चिटकून बसले. रोरी बर्न्स व हसीब हमीद यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात करून देताना विराट कोहलीचं टेंशन वाढवलं. चौथ्या दिवसाच्या बिनबाद ७७ धावांवरून आज सुरूवात करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी २३ धावांची भर घातली. शार्दूल ठाकूरनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. रोरी बर्न्स १२५ चेंडूंत ५ चौकारांसह ५० धावा करून माघारी परतला. india vs england 4th test, india vs england 4th test live
जसप्रीत बुमराहनं कसोटीत १०० विकेट्स घेण्याचा विक्रम केला. त्यानं २४ डावांमध्ये १०० विकेट्स घेत कपिल देव यांचा ( २५ डाव) विक्रम मोडला. कपिल देव यांनी १९८०मध्ये हा विक्रम केला होता. इरफान पठाणननं २००८मध्ये २८ डावांमध्ये व मोहम्मद शमीनं २०१८मध्ये २९ डावांमध्ये १०० कसोटी विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. जडेजानं मोईन अलीलाही बाद करून इंग्लंडला सहावा धक्का दिला.