ठळक मुद्देरोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीनं आज १९३६ सालचा विक्रम मोडला. लोकेश व रोहित यांनी यावेळी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीरांमध्ये दुसरे स्थान पटकावले.
India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी पहिल्या डावातील पिछाडी भरून काढताना टीम इंडियाला दुसऱ्या डावात ८३ धावांची सलामी दिली. भारताचा पहिला डाव १९१ धावांवर गुंडाळल्यानंतर इंग्लंडनं २९० धावा करून पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात रोहित व लोकेश यांनी दुसऱ्या डावात दमदार खेळ केला. पण, ३९ वर्षीय जेम्स अँडरसननं ही भागीदारी तोडली. लोकेशला ४६ धावांवर माघारी परतला, परंतु बाद दिल्याचा निर्णय त्याला पटलेला नाही. त्याच्या मते त्याची बॅट चेंडूला नव्हे तर पॅडला लागली. त्यामुळे पॅव्हेलियनमध्ये परत जाताना तो नाराज दिसत होता..
चौथ्या कसोटीत इंग्लंडच्या ओली पोप व ख्रिस वोक्स यांनी टीम इंडियाचे कंबरडे मोडले. दुसऱ्या दिवशी ५ बाद ६२ अशा दयनीय अवस्थेत असलेल्या इंग्लंडसाठी पोव व जॉनी बेअरस्टो ही जोडी धावून आली. त्यानंतर पोपनं चतूर खेळ केला. वोक्सनं अखेरच्या विकेटसाठी तुफान फटकेबाजी करताना इंग्लंडला पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी मिळवून दिली. इंग्लंडनं पहिल्या डावात २९० धावा केल्या. उमेश यादवनं सर्वाधिक ३, तर रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
रोहित-लोकेश जोडीनं मोडला ८५ वर्षांपूर्वीचा विक्रम
रोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीनं आज १९३६ सालचा विक्रम मोडला. लोकेश व रोहित यांनी यावेळी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीरांमध्ये दुसरे स्थान पटकावले. लोकेश व रोहित यांनी या मालिकेत ३६७* धावांची भागीदारी केली आहे. इंग्लंडमध्ये सर्वात यशस्वी भारतीय सलामीवीरांमध्ये सुनील गावस्कर व चेतन चौहान ही जोडी आघाडीवर आहे. त्यांनी १९७९च्या मालिकेत ४५३ धावा जोडल्या होत्या. रोहित व लोकेश यांनी ८५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. १९३६मध्ये विजय मर्चंट व सय्यद मुश्ताक अली यांनी ३६६ धावा जोडल्या होत्या.
रोहित शर्माच्या सलामीवीर म्हणून ११ हजार आंतरराष्ट्रीय धावा
रोहितनं तिसऱ्या दिवशी २६वी धाव काढून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ११ हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांनी हा पराक्रम केला आहे. सचिनंतर ( २४१ डाव) सर्वात कमी २४६ डावांमध्ये रोहितनं ही कामगिरी केली आहे. सध्या खेळत असलेल्या सलामीवीरांमध्ये सर्वाधिक धावा ख्रिस गेलच्या ( १८८४७) नावावर आहेत. त्यानंतर डेव्डिड वॉर्नर ( १४८०३), तमिम इक्बाल ( १४१७३), रोहित ( ११०००*), मार्टीन गुप्तील ( १०९७६) व शिखर धवन ( १०१७८) असा क्रमांक येतो.
Web Title: Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: KL Rahul thought it was bat hitting the back pad, Do you agree with Rahul or was the umpire right?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.