ठळक मुद्देकसोटी क्रिकेटमध्ये ३००० धावा करणारा रोहित २३वा फलंदाज ठरला. २०१३नंतर कसोटीत ३००० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत विराट कोहली, चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांच्यानंतर रोहितचा क्रमांक लागला
India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : टीम इंडियाची गाडी सेट झालीय असं वाटत असताना इंग्लंडच्या ऑली रॉबिन्सन यानं कमाल केली. रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी २७८ चेंडूंत १५३ धावांची भागीदारी करताना विक्रम केला. २००७नंतर इंग्लंडमध्ये भारताच्या दुसऱ्या विकेट्सनं केलेली ही पहिली शतकी भागीदारी आहे. २००७मध्ये राहुल द्रविड व दिनेश कार्तिक यांनी १२७ धावांची भागीदारी केली होती. टीम इंडिया विजयाच्या दिशेनं कूच करताना दिसत असतानाच इंग्लंडनं ब्रेक लावला. सहा चेंडूंत सामन्याचे चित्र पुन्हा बदलले आणि आता कर्णधार विराट कोहली याच्या खांद्यावर जबाबदारी आली आहे. india vs england 4th test, india vs england 4th test live
लोकेश राहुल व रोहित यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. रोरी बर्न्सनं दिलेल्या दोन जीवदानांचा पुरेपूर फायदा रोहितनं उचलला. लोकेशही अर्धशतकानजीक होता, परंतु इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसननं ही भागीदारी तोडली. अँडरसनचा इनस्वींग चेंडू लोकेशच्या बॅटची हलकीशी किनार घेत यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. लोकेश ४६ धावांवर माघारी परतला. रोहितनं त्यानंतर चेतेश्वर पुजारासह संयमी खेळ सुरूच ठेवला. या दोघांनीही चांगली भागादी करताना टीम इंडियाची आघाडी आणखी वाढवली. india vs england 4th test live score, india vs england 4th test scorecard
रोहितनं ७४ डावांमध्ये हा टप्पा ओलांडला, तर विराटनं ७३ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. रोहितपाठोपाठ चेतेश्वर पुजारानं अर्धशतक पूर्ण करून टीम इंडियाला दोनशे पार पल्ला गाठून दिला. रोहित व चेतेश्वर यांनी दुसऱ्या विकेट्ससाठी १०० धावांची भागीदारी केली. india vs england 4th test live udates, ind vs eng live test match
नवा चेंडू, ८१वे षटक अन् टीम इंडियाला दोन धक्केनवा चेंडू हाती घेऊन ऑली रॉबिन्सननं सामन्यातील ८१ वे षटक फेकण्यासाठी रन अप घेतले, त्यानं टाकलेला शॉर्ट चेंडू सीमापार पाठवण्यासाठी रोहितनं पुल शॉट खेळला, ख्रिस वोक्स फाईन लेगवरून धावत सुटला अन् रोहितला झेल टिपला. २५६ चेंडूंत १४ चौकार व १ षटकार खेचणारा रोहित १२७ धावांवर माघारी परतला. याच षटकाच्या सहाव्या चेंडूवर रॉबिन्सन यानं पुजाराला बाद केले. इनस्वींग झालेला चेंडू पुजाराच्या बॅटची कड घेत मांडीवर आदळून स्लीपमध्ये उभ्या असलेल्या मोईन अलीच्या हाती झेपावला. इंग्लंडच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला, परंतु मैदानावरील पंच नाबादच म्हणत होते. कर्णधार जो रूटनं DRS घेतला अन् पुजाराला १२७ चेंडूंत ९ चौकारांसह ६१ धावांवर माघारी जावं लागलं.ind vs eng live score, ind vs eng live score
Web Title: Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: Ollie Robinson gets two wickets in the first over with the second new ball, Rohit & Pujara gone, video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.