India vs England 4th test Live : रोहित शर्मा- लोकेश राहुल जोडी जमली, टीम इंडियाला दमदार सुरुवात करू दिली

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्मानं मोठा विक्रम केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 03:55 PM2021-09-04T15:55:24+5:302021-09-04T15:56:05+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: Rohit Sharma completes 11,000 runs as an opener in international cricket, He's the 4th Indian to achieve this milestone | India vs England 4th test Live : रोहित शर्मा- लोकेश राहुल जोडी जमली, टीम इंडियाला दमदार सुरुवात करू दिली

India vs England 4th test Live : रोहित शर्मा- लोकेश राहुल जोडी जमली, टीम इंडियाला दमदार सुरुवात करू दिली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्मानं मोठा विक्रम केला. इंग्लंडनं पहिल्या डावात घेतलेल्या ९९ धावांच्या आघाडीच्या प्रत्युत्तरात रोहित व लोकेश राहुल यांनी टीम इंडियाला अर्धशतकीय सलामी दिली. रोहितनं तिसऱ्या दिवशी २६वी धाव काढून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ११ हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला.( Rohit Sharma completes 11,000 runs as an opener in international cricket. He's the 4th Indian to achieve this milestone). सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांनी हा पराक्रम केला आहे. सचिनंतर ( २४१ डाव) सर्वात कमी २४६ डावांमध्ये रोहितनं ही कामगिरी केली आहे.  

सध्या खेळत असलेल्या सलामीवीरांमध्ये सर्वाधिक धावा ख्रिस गेलच्या ( १८८४७) नावावर आहेत. त्यानंतर डेव्डिड वॉर्नर ( १४८०३), तमिम इक्बाल ( १४१७३), रोहित ( ११०००*), मार्टीन गुप्तील ( १०९७६) व  शिखर धवन ( १०१७८) असा क्रमांक येतो.  

चौथ्या कसोटीत इंग्लंडनं ओली पोप व ख्रिस वोक्स यांना संघात स्थान दिले. या दोघांनीच टीम इंडियाचे कंबरडे मोडले. दुसऱ्या दिवशी ५ बाद ६२ अशा दयनीय अवस्थेत असलेल्या इंग्लंडसाठी पोव व जॉनी बेअरस्टो ही जोडी धावून आली. त्यानंतर पोपनं चतूर खेळ केला. वोक्सनं अखेरच्या विकेटसाठी तुफान फटकेबाजी करताना इंग्लंडला पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी मिळवून दिली. इंग्लंडनं पहिल्या डावात २९० धावा केल्या. उमेश यादवनं सर्वाधिक ३, तर रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. भारतानं दिवसअखेर बिनबाद ४३ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा २० व लोकेश राहुल २२ धावांवर खेळत होते.  


या जोडीनं आज १९३६ सालचा विक्रम मोडला. लोकेश व रोहित यांनी यावेळी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीरांमध्ये दुसरे स्थान पटकावले. लोकेश व रोहित यांनी या मालिकेत ३६७* धावांची भागीदारी केली आहे. इंग्लंडमध्ये सर्वात यशस्वी भारतीय सलामीवीरांमध्ये सुनील गावस्कर व चेतन चौहान ही जोडी आघाडीवर आहे. त्यांनी १९७९च्या मालिकेत ४५३ धावा जोडल्या होत्या. रोहित व लोकेश यांनी ८५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. १९३६मध्ये विजय मर्चंट व सय्यद मुश्ताक अली यांनी ३६६ धावा जोडल्या होत्या.
 

Web Title: Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: Rohit Sharma completes 11,000 runs as an opener in international cricket, He's the 4th Indian to achieve this milestone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.