India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : पाचव्या दिवसाच्या सत्रात ड्रायव्हर सीटवर बसलेल्या इंग्लंडला लंच ब्रेकनंतर टीम इंडियानं लांब फेकले. रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह या जोडीनं ६ धावांत इंग्लंडचे चार फलंदाज माघारी पाठवले. त्यामुळे एकवेळ २ बाद १४१ अशा सुस्थितित असलेला इंग्लंडचा डाव ६ बाद १४७ असा गडगडला. आता कर्णधार जो रूट याच्यावरच सर्व जबाबदारी आहे आणि उर्वरित ४ विकेट्सना सोबत घेऊन त्याला ४५ षटकं खेळून काढायची आहेत. हा सामना ड्रॉ करण्याचा इंग्लंडचा मानस भारतीय गोलंदाजांनी डळमळीत केला आणि त्यांच्यावर पराभवाचं संकट ओढावलं आहे. इंग्लंडचा डाव गडगडल्यानंतर विराट कोहलीनं ( Virat Kohli) इंग्लंडच्या चाहत्यांना डिवचले.
BCCIला वाढवायचाय हिंदी भाषिक चाहता वर्ग, म्हणून दोन नव्या संघांसाठी सहा शहरांची केलीय निवड!
भारतीय संघानं दुसऱ्या डावात ४६६ धावा करताना विजयासाठी ठेवलेल्या ३६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी केली. शार्दूल ठाकूरनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. शार्दूल ठाकूरनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. रोरी बर्न्स १२५ चेंडूंत ५ चौकारांसह ५० धावा करून माघारी परतला. त्यानंतर डेवीड मलानसाठी DRS घेतला गेला, परंतु अम्पायर्स कॉलमुळे तो वाचला. त्याला या जीवदानाचा फायदा उचलता आला नाही आणि पुढील षटकात तो माघारी परतला. लंच ब्रेकनंतर सर्व काही बदलले. रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांनी इंग्लंडला चार मोठे धक्के दिले. india vs england 4th test, india vs england 4th test live
हमीद ५५ धावांवर असताना रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजनं त्याचा सोपा झेल सोडला. मात्र, लंच ब्रेकनंतर जडेजानं अप्रतिम चेंडूवर हमीदचा त्रिफळा उडवला. हमीद १९३ चेंडूंत ६३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर जसप्रीतनं कमाल केली. त्यानं ओली पोप व जॉनी बेअरस्टो यांना झटपट माघारी पाठवले. जसप्रीत बुमराहनं कसोटीत १०० विकेट्स घेण्याचा विक्रम केला. त्यानं २४ डावांमध्ये १०० विकेट्स घेत कपिल देव यांचा ( २५ डाव) विक्रम मोडला. जडेजानं मोईन अलीलाही बाद करून इंग्लंडला सहावा धक्का दिला.
पाहा व्हिडीओ...
Web Title: Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: Virat Kohli 'Pipani' celebrations after Jasprit Bumrah fantastic yorker, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.