Join us  

India vs England 4th test Live : विराट कोहलीची शतकाची प्रतीक्षा पुन्हा लांबली; मोईन अलीनं महत्त्वाची विकेट घेतली, Video

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांनी चौथ्या कसोटीच्या तिसरा दिवस खेळून काढताना टीम इंडियाला मजबूत आघाडी मिळवून दिली. पण,

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 5:18 PM

Open in App

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांनी चौथ्या कसोटीच्या तिसरा दिवस खेळून काढताना टीम इंडियाला मजबूत आघाडी मिळवून दिली. पण, ऑली रॉबिन्सननं एकाच षटकात दोघांनी माघारी पाठवून टीम इंडियाला बॅकफूटवर फेकले. कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्याकडून मोठी अपेक्षा होती आणि त्यांनी ५९ धावांची भागादारी करून टीम इंडियाच्या आघाडीत भर टाकली. चौथ्या दिवशी विराटनं मोठ्या विक्रमाची नोंद केली, परंतु ख्रिस वोक्सनं दोन मोठे धक्के देऊन इंग्लंडला कमबॅकचे स्वप्न दाखवले. विराट चांगल्या टचमध्ये दिसत होता, परंतु फिरकीपटू मोईन अलीनं त्याला बाद केले. पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर विराटला राग अनावर झाला.

 विराट कोहलीनं केला विक्रम, पण ख्रिस वोक्सनं केला परफेक्ट कार्यक्रम

चौथ्या दिवशी पहिल्या अर्ध्यातासाच्या खेळात विराटनं सुरेख फटके मारले. जडेजाही सेट झालाय असे वाटत होते, परंतु वोक्सनं त्याला पायचीत पकडले. जडेजा १७ धावांवर माघारी परतला. अजिंक्य रहाणेही भोपळ्यावर पायचीत झाला. तो मागील २७ कसोटी डावांमध्ये ३ वेळा भोपळ्यावर माघारी परतला, तर दोन अर्धशतकं व एक शतक झळकावलं.  या सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १२७ सामन्यांत ९९२० धावा केल्या होत्या. त्यात ३४ शतकं व ३४ अर्धशतकांचा समावेश होता. पण, या सामन्यात पहिल्या डावात ५० आणि दुसऱ्या डावात ३०वी धाव घेताच त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या. रिषभ पंतनंही कसोटीतील १५०० धावा पूर्ण केल्या. त्यानं नयन मोंगियाचा १४४२ धावांचा विक्रम मोडला. ( Most test runs by Indian WK) महेंद्रसिंग धोनी ( ४८७६), सय्यद किरमानी ( २७५९) व फारूख इंजिनियर्स ( २६११) हे आघाडीवर आहेत.  

वी शास्त्री यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, टीम इंडियाचे चार सदस्य विलगिकरणात; 

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड येथे कसोटीत १०००+ धावा करणारा विराट कोहली तिसरा भारतीय फलंदाज ठरला. सचिन तेंडुलकर ( १८०९ व १५७५) , राहुल द्रविड ( ११४३ व १३७६) आणि विराट कोहली ( १३५२ व १००२*) हे ते तीन फलंदाज आहेत.   इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये विराटनं चौथं स्थान पटकावलं आहे.  सचिन तेंडुलकर ( १५७५), राहुल द्रविड ( १३७६), सुनील गावस्कर ( ११५२) हे आघाडीवर आहेत. विराटनं १०००+ धावा करून दिलीप वेंगसरकर (  ९६०) व सौरव गांगुली ( ९१५) यांचा विक्रम मोडला. विराट ४४ धावांवर बाद झाला.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहली
Open in App