India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारतीय संघानं दुसऱ्या डावात ४६६ धावा करताना इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताविरुद्ध आतापर्यंत कोणत्याच संघाला चौथ्या डावात एवढे मोठे लक्ष्य पार करता आलेले नाही. पण, फलंदाजांसाठी पोषक बनलेल्य़ा खेळपट्टीवर इंग्लंडचे सलामावीर चिटकून बसले. रोरी बर्न्स व हसीब हमीद यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात करून देताना विराट कोहलीचं टेंशन वाढवलं. दिवसअखेर इंग्लंडची एकही विकेट पडलेली नाही आणि आता पाचव्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे.
भारताकडून दुसऱ्या डावात रोहित शर्मानं १२७ व लोकेश राहुलन ४६ धावा करत चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर चेतेश्वर पुजारानं ६१ धावा करताना रोहितला तोलामोलाची साथ दिली. विराट कोहलीला पुन्हा एकदा शतकापासून वंचित रहावे लागले असले तरी त्याच्या ४४ धावांच्या खेळीनं टीम इंडियाला मजबूती दिली. चौथ्या दिवशी रिषभ पंत ( ५०) व शार्दूल ठाकूर ( ६०) यांनी सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चेहऱ्यावरील हास्य हिरावून घेतेल. टीम इंडियानं दुसऱ्या डावात ४६६ धावा करताना इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. india vs england 4th test, india vs england 4th test live
रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा यांच्यावर संकट ओढावलं; क्षेत्ररक्षणासाठी BCCIनं मैदानावर नाही उतरवलं!
हसीब हमीद व रोरी बर्न्स यांनी इंग्लंडला दुसऱ्या डावात पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून दिली. खेळपट्टीनं गोलंदाजांना साथ देणं सोडल्यामुळे इंग्लंडचे फलंदाज त्रास देतील याची जाण विराटलाही होतीच. त्यामुळे त्यानं फिरकीपटू रवींद्र जडेजाला लवकर पाचारणं केले. खेळपट्टीनं चेंडू फिरकी घेण्यास त्याला मदत केली, परंतु हमीद व बर्न्स जोडीनं संयमानं त्याचा सामना केला. हमीद ४३ धावांवर असताना मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर LBW अपील झालं, परंतु मैदानावरील पंचांनी नाबाद देताच विराटनं DRS घेतला. पण, त्याचा हा निर्णय चुकला आणि एक DRS वाया गेला.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं बिनबाद ७७ धावा केल्या आहेत आणि त्यांना विजयासाठी २९१ धावा करायच्या आहेत. हमीद ४३, तर बर्न्स ३१ धावांवर खेळत आहेत
रोहित व चेतेश्वर दुखापतग्रस्त...
शतकवीर रोहित शर्मा व अर्धशतकवीर चेतेश्वर पुजारा हे दोघंही चौथ्या दिवशी मैदानावर क्षेत्ररक्षणाला उतरलेले नाहीत. रोहित शर्माच्या डाव्या गुडघ्यात दुखापत झालीय, तर पुजाराच्या पायाच्या घोटा दुखावला आहे. त्यामुळे त्यांनी विश्रांती घेतली आहे. त्यांच्या ऐवजी मैदानावर सूर्यकुमार यादव आणि मयांक अग्रवाल स्लीपमध्ये उभे राहिलेले दिसत आहेत. बीसीसीआयनंही यामागचं कारण सांगितल आणि ते ऐकून चाहत्यांचं टेंशन वाढलं आहे. इंग्लंडच्या वेगवाना गोलंदाजांचा मार आपल्या मांडीवर झेलून रोहित तिसऱ्या दिवशी टीम इंडियासाठी यजमानांना भिडला. त्याला होणाऱ्या वेदनेची जाणीव करून देणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Web Title: Ind vs Eng 4th Test 2021 : Stump day 4 - England no loss 77 runs, they need 291 more runs to win while India will be in search of 10 wickets tomorrow
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.