Join us  

IND vs ENG, 4th Test : चल फूट!; सुनील गावस्कर संतापले अन् लाईव्ह सुरू असताना खडेबोल सुनावले

IND vs ENG, 4th Test : 'chal phoot', Sunil Gavaskar चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकमध्ये गावस्करांचा पारा भलताच चढलेला पाहायला मिळाला. त्यांनी लाईव्ह सुरू असताना 'चल फूट' असे म्हणत टीकाकारांना खडेबोल सुनावले.

By स्वदेश घाणेकर | Published: March 04, 2021 12:41 PM

Open in App
ठळक मुद्देइंग्लंडचे चार फलंदाज माघारी, अक्षर पटेल व मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी दोन विकेट्सइंग्लंडचा कर्णधार जो रुट स्वस्तात माघारी परतल्यानं टीम इंडियाला मोठं यश

IND vs ENG, 4th Test : भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेत खेळपट्टीचा मुद्दा वारंवार चर्चिला गेला. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन सातत्यानं खेळपट्टीवरून BCCI आणि टीम इंडियावर टीका करताना पाहायला मिळाला. त्याला भारताचे माजी कसोटीपटू सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांच्याकडून वेळोवेळी सडेतोड उत्तर मिळालं. पण, चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकमध्ये गावस्करांचा पारा भलताच चढलेला पाहायला मिळाला. त्यांनी लाईव्ह सुरू असताना 'चल फूट' असे म्हणत टीकाकारांना खडेबोल सुनावले. गावस्करांचा 'chal phoot'चा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. ( chal phoot, Sunil Gavaskar best reply for pitch criticism) अक्षर पटेलचा पहिल्या षटकाचा करिष्मा, पूर्ण केली हॅटट्रिक; इंग्लंडला तीन धक्के

भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीचे पहिले सत्र टीम इंडियानं आपल्या नावावर केलं. अक्षर पटेल (  Axar Patel) यानं इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवलं. त्यानंतर मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याला माघारी पाठवून टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. पण, ३ बाद ३० धावांवरून इंग्लंडचा डाव बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो यांनी सावरला आहे. अक्षर पटेलनं पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. डॉम सिब्ली ( २) त्रिफळाचीत झाला. त्यानंतर पुढच्या षटकात अक्षरनं इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅव्ली ( ९) याला चूक करण्यास भाग पाडले आणि इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर १५ धावांवर माघारी परतले. Someone is getting angry; रिषभ पंतनं यष्टिंमागून चिडवलं अन् इंग्लंडच्या फलंदाजानं केली चूक

लंच ब्रेकनंतर सिराजनं इंग्लंडची सेट जोडी तोडली आणि जॉनी बेअरस्टोला त्यानं पायचीत करून माघारी पाठवले. दरम्यान, लंच ब्रेकमध्ये स्टार स्पोर्ट्स वाहिनीसाठी समालोचन करताना गावस्करांनी खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना अधिक महत्त्व द्यायला नको, त्यांना चल फूट असंच म्हणायला हवं, असे विधान केलं. मोहम्मद सिराजनं डिवचले अन् विराट कोहली - बेन स्टोक्स एकमेकांना भिडले, Video  ind vs eng live score from narendra Modi stadium

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडसुनील गावसकर