Join us  

India vs England 4th test Live : अम्पायर्स कॉलनं दिलं जीवदान, परंतु अति घाईनं इंग्लंडच्या फलंदाजाचा केला घात

भारताविरुद्ध आतापर्यंत कोणत्याच संघाला चौथ्या डावात एवढे मोठे लक्ष्य पार करता आलेले नाही. पण, फलंदाजांसाठी पोषक बनलेल्य़ा खेळपट्टीवर इंग्लंडचे सलामावीर चिटकून बसले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 5:13 PM

Open in App

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारतीय संघानं दुसऱ्या डावात ४६६ धावा करताना विजयासाठी ठेवलेल्या ३६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी केली. शार्दूल ठाकूरनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर डेवीड मलानसाठी DRS घेतला गेला,  परंतु अम्पायर्स कॉलमुळे तो वाचला. त्याला या जीवदानाचा फायदा उचलता आला नाही आणि पुढील षटकात तो माघारी परतला. 

IPL 2022 मधील दोन नवीन संघांसाठी सहा शहरांची BCCIनं केलीय निवड!

भारताविरुद्ध आतापर्यंत कोणत्याच संघाला चौथ्या डावात एवढे मोठे लक्ष्य पार करता आलेले नाही. पण, फलंदाजांसाठी पोषक बनलेल्य़ा खेळपट्टीवर इंग्लंडचे सलामावीर चिटकून बसले. रोरी बर्न्स व हसीब हमीद यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात करून देताना विराट कोहलीचं टेंशन वाढवलं. चौथ्या दिवसाच्या बिनबाद ७७ धावांवरून आज सुरूवात करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी २३ धावांची भर घातली. शार्दूल ठाकूरनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. रोरी बर्न्स १२५ चेंडूंत ५ चौकारांसह ५० धावा करून माघारी परतला. india vs england 4th test, india vs england 4th test live

बर्न्स बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीचा उत्साह पाहण्यासारखा होता. त्यानं नेहमीच्या आक्रमक पवित्र्यात चाहत्यांकडे बघून जल्लोष केला आणि टीम इंडियाला आणखी चिअर करण्यास सांगितले. बर्न्सनंतर पुढील षटकात हसीब हमीदनं १२३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. २००८ मध्ये इंग्लंडकडून चौथ्या डावात पहिल्या विकेटसाठी अखेरची शतकी खेळी झाली होती. १३ वर्षांनंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी आज पराक्रम केला. हमीद ५५ धावांवर असताना रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजनं त्याचा सोपा झेल सोडला. ( Mohammad Siraj drops a simple catch of Haseeb Hameed, a big moment in the game) 

जडेजाच्या गोलंदाजीवर डेवीड मलानसाठी LBWची अपील झाली, परंतु मैदानावरील अम्पायरनं नाबाद दिले. विराटनं DRS घेण्याचा निर्णय घेतला आणि अम्पायर्स कॉल दिल्यानं मलानला जीवदान मिळालं. पण, जडेजाच्या पुढील षटकात अति घाई नडली व मलान ५ धावांवर रन आऊट झाला. india vs england 4th test live score, india vs england 4th test scorecard

टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाचे हायलाईट्स...भारताकडून दुसऱ्या डावात रोहित शर्मानं १२७  व लोकेश राहुलन ४६ धावा करत चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर चेतेश्वर पुजारानं ६१ धावा करताना रोहितला तोलामोलाची साथ दिली. विराट कोहलीला पुन्हा एकदा शतकापासून वंचित रहावे लागले असले तरी त्याच्या ४४ धावांच्या खेळीनं टीम इंडियाला मजबूती दिली. चौथ्या दिवशी रिषभ पंत ( ५०) व शार्दूल ठाकूर ( ६०) यांनी सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चेहऱ्यावरील हास्य हिरावून घेतेल.  टीम इंडियानं दुसऱ्या डावात ४६६ धावा करताना इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.  india vs england 4th test, india vs england 4th test live 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरवींद्र जडेजा
Open in App