Join us  

'रांची'तील चौथ्या कसोटी सामन्याआधी ध्रुव जुरेलने व्यक्त केली विशेष इच्छा; MS धोनी पूर्ण करणार?

Ind Vs Eng 4th Test: ध्रुव जुरेलने इंग्लंडविरुद्धच्या राजकोट येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात पदापर्ण केले.  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 10:39 AM

Open in App

Ind Vs Eng 4th Test: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथी कसोटी २३ फेब्रुवारीलापासून रांची येथे खेळवली जाणार आहे. या सामन्याआधी युवा यष्टिरक्षक- फलंदाज ध्रुव जुरेल याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ध्रुव जुरेलने इंग्लंडविरुद्धच्या राजकोट येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात पदापर्ण केले. यावेळी पहिल्या डाव्यात जुरेलने ४६ धावा केल्या. तर दुसऱ्या डावांत त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. जुरेल २०२१ ला राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळताना केवळ एकदा धोनीला भेटला होता. त्या वेळी माहीने त्याला टिप्स दिल्या होत्या. याची आठवण जुरेलने 'बीसीसीआय डॉट टीव्ही'शी बोलताना सांगितली. 

माहीभाईची भेट घेणे माझे स्वप्न आहे. मागच्या वेळी आयपीएलदरम्यान आम्ही भेटलो, आता भारतीय संघाच्या जर्सीत भेट घ्यायची आहे. रांची येथे माहीची भेट घेत त्याच्याकडून खेळातील बारकावे शिकण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा धोनीची भेट घेणे हे माझे स्वप्न आहे. मला त्याच्याकडून बरेच काही शिकण्याची इच्छा आहे, असं जुरेल म्हणाला. माहीभाईसोबत जेव्हा कधी संवाद साधला तेव्हा नवे काहीतरी शिकायला मिळाले, असंही जुरेलने सांगितले. 

२०२१ च्या धोनीसोबतच्या आठवणींना उजाळा देत ध्रुव पुढे म्हणाला,'धोनी माझ्यापुढे उभा असताना मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. त्याच्याशी संवाद साधतेवेळी स्वतःला चिमटा काढत होतो. मी माहीला विचारले की, 'तुझ्यासोबत एक फोटो घेऊ शकतो का?' त्याने लगेच होकार दिला आणि आम्ही सोबत फोटो काढला. त्याने मला चेंडू नीट पाहून खेळ, असा महत्वाचा सल्ला देखील दिला होता, असं जुरेल 'बीसीसीआय डॉट टीव्ही'शी बोलताना म्हणाला. 

उद्यापासून रंगणार चौथा कसोटी सामना-

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धची तिसरी कसोटी भारताने ४३४ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकली. या कसोटीसाठी भारतीय संघात बदल करण्यात आले आहे. मालिकेचा दीर्घ कालावधी लक्षात घेऊन आणि वर्क लोड पाहता, जसप्रीतला विश्रांती दिली गेली आहे. मुकेश कुमार ज्याला तिसऱ्या कसोटीतून रिलीज केले गेले होते, तो रणजी करंडक स्पर्धेतील सामना खेळून पुन्हा रांची येथे टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल झाला आहे. 

भारतीय संघ- रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, केएस भरत, देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडमहेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय