ठळक मुद्देरिषभ पंतचे शतक अन् वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद ९६ धावाअक्षर पटेलनं ४८ धावांत पाच विकेट घेतल्या, आर अश्विननंही ४७ धावांत पाच बळी टिपलेटीम इंडियानं चार सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली
India vs England, 4th Test : वॉशिंग्टन सुंदरच्या ( Washington Sunder) हुकलेल्या शतकानं सर्वांना वाईट वाटलं... ९६ धावांवर खेळत असताना समोर तीन फलंदाज होते, परंतु एकामागून एक तिघेही माघारी परतले. पण, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) विजय मिळवून भारतानं मालिका ३-१ अशी खिशात घातली. रिषभ पंत व अक्षर पटेल यांच्यासह शतकी भागीदारी करणाऱ्या वॉशिंग्टननं टीम इंडियाला १६० धावांची आघाडी मिळवून दिली. इंग्लंडचा दुसरा डावही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. आर अश्विन ( R Ashwin) आणि अक्षर पटेल ( Axar Patel) यांनी इंग्लंडला धक्के दिले. अक्षर पटेलनं पुन्हा एकदा डावात पाच विकेट्स घेत इतिहास रचला. इंग्लंडचा दुसरा डाव १३५ धावांवर गडगडला आणि टीम इंडियानं एक डाव व २५ धावांनी विजय मिळवला. अश्विननेही पाच विकेट्स घेतल्या. Ind vs Eng live test score from Narendra Modi Stadium
मॅच हायलाईट्स - चौथ्या कसोटीचा दुसरा दिवस रिषभ पंतनं गाजवला. ६ बाद १४६ वरून त्यानं वॉशिंग्टनच्या साथीनं टीम इंडियाला २५९ धावांपर्यंत नेले. रिषभ व वॉशिंग्टन यांनी सातव्या विकेटसाठी १५८ चेंडूंत ११३ धावा जोडल्या. रिषभ ११८ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०१ धावांवर माघारी परतला.
- रिषभनंतर वॉशिंग्टननं जबाबदारीनं खेळ करताना इंग्लंडच्या गोलंदाजांची शाळा घेतली. ऑस्ट्रेलियात शार्दूल ठाकूरसोबत खंबीरपणे उभा राहिलेल्या सुंदरनं इंग्लंडच्या गोलंदाजांनाही दमवलं. त्याला अक्षर पटेलकडूनही तोलामोलाची साथ मिळाली. ind vs eng, ind vs eng 4th test
- भारताकडून प्रथमच सातव्या आणि आठव्या विकेटसाठी एकाच कसोटीत शतकी भागीदारी झाल्या. वॉशिंग्टन सुंदर-रिषभ पंत यांनी सातव्या विकेटसाठी ११३ ( १५८ चेंडू ) आणि वॉशिंग्टन - अक्षर पटेल १०६ ( १७९ चेंडू) यांनी शतकी भागीदारी केली.
- अक्षर पटेला बाद झाला तेव्हा टीम इंडियाच्या ८ बाद ३६५ धावा होत्या. अक्षरनं ९७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४३ धावा केल्या. तेव्हा वॉशिंग्टन ९६ धावांवर होता. उर्वरित दोन फलंदाजांना त्याला केवळ साथ द्यायची होती, परंतु इशांत शर्मा व मोहम्मद सिराज यांना बेन स्टोक्सनं शून्यावर बाद केलं आणि वॉशिंग्टनचं शतकाचं स्वप्न अपूरं राहिलं. ind vs eng latest live score
- वॉशिंग्टन १७४ चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून ९६ धावांवर नाबाद राहिला. भारतानं पहिल्या डावात ३६५ धावा केल्या आणि १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडच्या बेन स्टोक्सनं चार, जेम्स अँडरसननं तीन आणि जॅक लिचनं दोन विकेट्स घेतल्या.
- पहिल्या चार कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजामध्ये अक्षर पटेलनं पटकावलं दुसरं स्थान. नरेंद्र हिरवानी यांनी ३६ विकेट्स घेतल्या होत्या, तर अश्विननं २६. अक्षरनं अश्विनला टाकले मागे
- या मालिकेत आतापर्यंत २५ फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी पायचीत केले आहेत. १९७९-८० नंतर ( २४ LBW वि. ऑस्ट्रेलिया) आणि २०१६-१७ ( २४ LBW वि. इंग्लंड) ही सर्वोत्तम कामगिरी आहे. ind vs eng live score from narendra Modi stadium
- अक्षर पटेलनं कसोटीत पदार्पण केल्यापासून सहा डावांमध्ये चार वेळा पाच + विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक २७ विकेट्स ( ३ सामने) घेत अक्षर पटेलनं अनेक दिग्गजांना मागे टाकले. दीलीप जोशी यांनी ६ सामन्यांत २७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर शिवलाल यादव ( २४ विकेट्स, ६ सामने), आर अश्विन ( २२ विकेट्स , ३ सामने) यांचा क्रमांक येतो.
Web Title: IND vs ENG, 4th Test : India beat England 3-1, and qualify for the final of the ICC World Test Championship
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.