India vs England 4th Test Live Update Marathi News : यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal ) हे नाव आता भारतीय क्रिकेटच्या अधिक परिचयाचे झाले आहे. युवा फलंदाजाने इंग्लंडविरुद्धचद्या कसोटी मालिकेत दोन द्विशतक झळकावली आहेत. राजकोट कसोटीत त्याच्या द्विशतकाच्या जोरावर भारताला ४३४ धावांनी विजय मिळवून देण्यात हातभार लावला. यशस्वीच्या आक्रमक खेळीने त्याच्या फॅन फॉलोअर्सची संख्या वाढवली आहे. नुकतंच त्यानेही मुंबईत पाच कोटींचं घर खरेदी केलं आहे. पण, सध्या यशस्वीच्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा आहे.
या व्हिडीओत ड्रेसिंग रुममध्ये उभ्या असलेल्या यशस्वीकडे फॅन गर्ल त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या भारतीय खेळाडूला बोलवण्याची विनंती करताना दिसतेय.. तो खेळाडू कोण हे व्हिडीओत दिसत नाही. पण, यशस्वी त्या मुलीला मजेशीर उत्तर देताना ऐकू येतंय..
इंग्लंडने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात चांगले पुनरागमन केले. भारताचा पदार्पणवीर आकाश दीपने धक्के दिले, परंतु अनुभवी फलंदाज जो रूट ( Joe Root ) मैदानावर उभा राहिला आणि त्याने ५ बाद ११२ धावांवरून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. जॉनी बेअरस्टो ( ३८) , बेन फोक्स ( ४७) व ऑली रॉबिन्सन ( ५८) यांना सोबत घेऊन रूटने भारताला टक्कर दिली. जो रूटने सहाव्या विकेटसाठी फोक्ससह ११३ धावा जोडल्या आणि रॉबिन्सनसह आठव्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रवींद्र जडेजाने इंग्लंडचे शेवटचे तीन फलंदाज माघारी पाठवले. इंग्लंडचा पहिला डाव ३५३ धावांवर गुंडाळला. जो रूट २७४ चेंडूत १० चौकारांसह १२२ धावांवर नाबाद राहिला. जडेजाने ३, आकाश दीपने ३ आणि मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेतल्या. भारताच्या डावातील तिसऱ्या षटकात रोहित शर्मा २ धावांवर माघारी परतला. जेम्स अँडरसनने ४ धावांवर पहिला धक्का दिला.
Web Title: IND vs ENG 4th Test : "Mujhe Bhi Darr Lagta Hai", Yashasvi Jaiswal's Hilarious Interaction With Fan Girl, Video Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.