India vs England, 4th Test : भारत-इंग्लंड ( India vs England) यांच्यातल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना अवघ्या दोन दिवसांत संपला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) खेळवण्यात आलेल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्याच्या निकालानंतर खेळपट्टीवर टीका होत आहे. खेळपट्टीवरून अनेकांनी आपापली मतं व्यक्त केली. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन ( Michael Vaughan) हा सातत्यानं भारतातील खेळपट्टींवर टीका करताना पाहायला मिळत आहे. मंगळवारी त्यानं असाच एक फोटो पोस्ट करून टीम इंडियावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या कसोटीनंतर त्यानं क्युरेटरची तुलना शेतकऱ्याशी केली होती. Michael Vaughan compares curators to farmers टीम इंडियानं घाबरू नये, चौथ्या कसोटीसाठी 'Fair Pitch' तयार करावे; शोएब अख्तरचा सल्ला
अहमदाबाद कसोटी दोन दिवसांत संपल्यानंतर प्रत्येकजण खेळपट्टीवर नाराजी व्यक्त करत आहे. या खेळपट्टीवर ३० विकेट्सपैकी २८ बळी हे फिरकी गोलंदांजी घेतल्या. आश्चर्याची बाब म्हणजे इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं ८ धावांत ५ विकेट्स घेत इंडियाला धक्के दिले. भारतानं हा सामना १० विकेट्स राखून जिंकला. गुरुवारपासून चौथ्या कसोटीला सुरुवात होणार आहे आणि आतापासूनच खेळपट्टीची चर्चा सुरू झाली आहे.