India vs England, 4th Test : भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा पाहुण्यांचा समाचार घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर १५ धावांवर माघारी परतले. अक्षर पटेलनं ( Axar Patel) त्यांना बाद केले. इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) आजही अपयशी ठरला आणि जसप्रीत बुमराहच्या जागी खेळणाऱ्या मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) त्याला पायचीत पकडले. भारतीय गोलंदाजांच्या या यशात यष्टिरक्षक रिषभ पंत ( Rishabh Pant) याचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. ( Rishabh Pant sledging behind stumps) मोहम्मद सिराजनं डिवचले अन् विराट कोहली - बेन स्टोक्स एकमेकांना भिडले, Video
२००२नंतर कसोटीच्या पहिल्या दहा षटकांत दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवणारा अक्षर पटेल हा पहिलाच गोलंदाज ठरला. कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) सहाव्या षटकात फिरकीपटू अक्षर पटेलला पाचारण केलं आणि त्यानं पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. डॉम सिब्ली ( २) त्रिफळाचीत झाला. त्यानंतर पुढच्या षटकात अक्षरनं इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅव्ली ( ९) याला चूक करण्यास भाग पाडले. झॅक बाद होण्यापूर्वी यष्टिरक्षक रिषभ पंतनं त्याला डिवचलं होतं आणि त्यामुळे तो चूक करून माघारी परतला. Ind vs eng 4th test Six Sixes in an over : किरॉन पोलार्ड, युवराज सिंग यांच्यासह ९ फलंदाजांनी केलाय हा पराक्रम!
नेमकं काय घडलं?
- रिषभ पंत - कुणाला तरी राग येतोय, कुणाला तरी राग येतोय
- विराट कोहली - खराब फटका आता पाहायला मिळेल
- पुढच्याच चेंडूवर झॅकनं पुढे येऊन हवेत चेंडू टोलावला आणि मोहम्मद सिराजनं झेल टिपून इंग्लंडच्या सलामीवीराला मागे जाण्यास भाग पाडले. India vs England 4th test cricket टीम इंडिया अन् झिम्बाब्वे यांनी मिळून १३२ वर्षानंतर कसोटीत केला पराक्रम; जाणून घ्या काय आहे हा विक्रम
Web Title: IND vs ENG, 4th Test : Rishabh Pant sledging behind stumps, Axar Patel gets Zak Crawley wickets, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.