IND vs ENG, 4th Test : रिषभ पंतचे दमदार शतक, अँडरसनच्या गोलंदाजीवर खतरनाक रिव्हर्स स्वीप, Video 

IND vs ENG, 4th Test : Rishabh Pant टीम इंडियाचा डाव झटपट गुंडाळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या इंग्लंडला रिषभ पंतनं ( Rishabh Pant) तडाखा दिला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतानं ७ बाद २९४ धावा करत ८९ धावांची आघाडी घेतली आहे. सूंदर ६० धावांवर खेळत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: March 5, 2021 05:00 PM2021-03-05T17:00:26+5:302021-03-05T17:06:48+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 4th Test: Rishabh Pant's powerful century, dangerous reverse sweep on James Anderson's bowling, Video | IND vs ENG, 4th Test : रिषभ पंतचे दमदार शतक, अँडरसनच्या गोलंदाजीवर खतरनाक रिव्हर्स स्वीप, Video 

IND vs ENG, 4th Test : रिषभ पंतचे दमदार शतक, अँडरसनच्या गोलंदाजीवर खतरनाक रिव्हर्स स्वीप, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 4th Test : रोहित शर्माला ( Rohit Sharma) बाद केल्यानंतर टीम इंडियाचा डाव झटपट गुंडाळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या इंग्लंडला रिषभ पंतनं ( Rishabh Pant) तडाखा दिला. रिषभनं दमदार फटकेबाजी करताना भारताचा डाव सावरला आणि संघाला आघाडीही मिळवून दिली. रिषभनं सातव्या विकेटसाठी वॉशिंग्टन सूंदरसह ( Washington Sunder) अर्धशतकी भागीदारी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. ९०० आंतरराष्ट्रीय विकेट्स नावावर असलेल्या जेम्स अँडरसनचीही रिषभनं निर्दयीपणे धुलाई केली. अँडरसनच्या चेंडूवर रिषभनं मारलेला रिव्हर्स फटका लाजवाब होता. इंग्लंडचा गोलंदाजही अवाक् झाला.  Ind vs Eng live test score from Narendra Modi Stadium रोहित शर्मा OUT झाल्यावरून सुरू झालाय वाद; चाहत्यांची ICCला लक्ष घालण्याची मागणी 



जो रूटला खणखणीत षटकार खेचून पंतनं कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केलं. कर्णधार विराट कोहलीनंही ड्रेसिंग रुममधून धाव घेत पेव्हेलियनमध्ये येत रिषभचे कौतुक केले. घरच्या मैदानावर यापूर्वी तीनवेळा शतकाच्या उंबरठ्यावरून रिषभला माघारी फिरावे लागले होते, परंतु आज त्यानं तो ओलांडला. पुढच्याच षटकात अँडरसननं त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. जो रूटनं रिषभची कॅच घेतली. रिषभ ११८ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारासह १०१ धावांवर माघारी परतला. ६ बाद १४६ वरून त्यानं वॉशिंग्टनच्या साथीनं टीम इंडियाला २५९ धावांपर्यंत नेले. रिषभ व वॉशिंग्टन यांनी सातव्या विकेटसाठी १५८ चेंडूंत ११३ धावा जोडल्या. रिषभ बाद झाल्यानंतर वॉशिंग्टननं खिंड लढवताना अर्धशतक पूर्ण केलं. test cricket, India vs England 4th test cricket कोण होणार जसप्रीत बुमराहची नवरी?; टीम इंडियाचा गोलंदाज महाराष्ट्राचा जावई बनणार की साऊथचा?

 - इंग्लंडविरुद्ध कसोटीत शतक झळकावणारा सहावा यष्टिरक्षक ठरला रिषभ पंत
- आतापर्यंत आशियातील दोन यष्टिरक्षकांना इंग्लंडविरुद्ध कसोटीत शतक झळकावता आले
- वृद्धीमान सहाच्या तीन कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी, परंतु महेंद्रसिंग धोनी ( 6)  पेक्षा मागे 


१ बाद २४ धावांवरून सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी ४० धावांवर दुसरा धक्का बसला. जॅक लिचनं टीम इंडियाच्या पुजाराला ( १७) पायचीत केलं. मैदानावरील पंचांच्या निर्णयाविरोधात DRS घेतला गेला, परंतु तिसऱ्या पंचांनीही निर्णय कायम राखला. त्यानंतर आलेल्या विराटला ८व्या चेंडूवर बेन स्टोक्सनं झेलबाद करून माघारी पाठवले. विराटला भोपळाही फोडता आला नाही. अजिंक्य चांगल्या फॉर्मात दिसत होता, परंतु तोही २७ धावांवर जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. ind vs eng 4th test cricket 2021 Narendra Modi Stadium live score  रोहित शर्माचा मोठा पराक्रम, जगातील एकाही ओपनरला आतापर्यंत जमला नाही हा विक्रम!

रोहितनं यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत याच्यासह संघाची खिंड लढवली. पण, रोहित बाद झाल्यानंतर टीम इंडिया अडचणीत सापडेल असे वाटले होते. बने स्टोक्सनं त्याला ५०व्या षटकात पायचीत केले. रोहितनं १४४ चेंडूंत ७ चौकारांसह ४९ धावा केल्या. आर अश्विनही १३ धावांवर बाद झाला. मात्र, रिषभनं इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. 

Web Title: IND vs ENG, 4th Test: Rishabh Pant's powerful century, dangerous reverse sweep on James Anderson's bowling, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.