India vs England, 4th Test : इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियानं सावध खेळ केला आहे. शुबमन गिल पहिल्याच षटकात माघारी परतल्यानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwa Pujara) यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. पण, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अवघ्या १६ धावांची भर घातल्यानंतर पुजारा ( १७) बाद झाला. दरम्यान, रोहितनं खिंड लढवताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ( ICC World Test Championship) १००० धावा करणाऱ्या पहिल्या सलामीवीराचा मान रोहितनं पटकावला. शिवाय अजिंक्य रहाणेनंतर ( Ajinkya Rahane) WTCमध्ये १००० धावा करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला. ind vs eng live score from narendra Modi stadium
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे सलामीवीर ( Most runs in WTC Among Openers)
रोहित शर्मा - १०००*
डेव्हिड वॉर्नर - ९४८
डिन एल्गर - ८४८
डॉम सिब्ली - ८४१
मयांक अग्रवाल - ८१०
अजिंक्य रहाणेनं ( १०६८) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना WTCमध्ये १००० धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला होता. मार्नस लाबुशेन ( १६७५), जो रूट ( १६३०), स्टीव्ह स्मिथ ( १३४१), बेन स्टोक्स ( १३३२) हे फलंदाज आघाडीवर आहेत. India vs England 4th test cricket सचिन-वीरूची जोडी, पठाण बंधूंची फटकेबाजी; क्रिकेटचे दिग्गज आजपासून 'अॅक्शन' मोडमध्ये!
सलामीवीर म्हणून सर्वात जलद १००० धावा करणारे फलंदाज
हर्बर्ट शटक्लिफ - १३ डाव
लेन हटन - १६ डाव
रोहित शर्मा - १७ डाव
ग्रॅमी स्मिथ - १७ डाव
तीनही फॉरमॅटमध्ये १००० धावा करणारे भारतीय
शिखर धवन आणि रोहित शर्मा
ind vs eng, ind vs eng 4th test इंग्लंड पुन्हा अडकला फिरकीच्या जाळ्यात
अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन जोडीच्या फिरकी जाळ्यात पाहुणा संघ पुन्हा अडकला. चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव पहिल्या दिवशी चहापानानंतर २०५ धावांत संपुष्टात आला. गेल्या कसोटीत ११ बळी घेणारा स्थानिक स्टार अक्षरने ६८ धावांच्या मोबदल्यात चार बळी घेतले, तर अश्विनने ४७ धावांत तीन बळी घेतले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दोन फलंदाजांना माघारी परतवले. बेन स्टोक्सचा (५५) अपवाद वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.
Web Title: Ind vs Eng 4th test : Rohit Sharma became 1st Opener to Score 1000 runs in World Test Championship
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.