Ind vs Eng 4th test : भारत-इंग्लंड ( India vs England) यांच्यातल्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अक्षर पटेलनं ( Axar Patel) इंगा दाखवला. कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) सहाव्या षटकात फिरकीपटू अक्षर पटेलला पाचारण केलं आणि त्यानं पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. डॉम सिब्ली ( २) त्रिफळाचीत झाला. त्यानंतर पुढच्या षटकात अक्षरनं इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅव्ली ( ९) याला चूक करण्यास भाग पाडले आणि इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर १५ धावांवर माघारी परतले. इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याचा अडथला मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) यानं दूर केला. त्यानंतर आलेल्या बेन स्टोक्सला ( Ben Stokes) सिराजनं डिवचलं आणि त्यानंतर विराट व स्टोक्स यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मैदानावरील पंचांना या दोघांचं भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करावी लागली. ( Some heated exchanged between Virat Kohli and Ben Stokes)
नेमकं काय झालं?जसप्रीत बुमराहच्या जागी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या सिराजनं १२व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जो रूटला ( ५) पायचीत केलं. त्यानंतर आलेल्या स्टोक्सनं पहिलाच चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो एज लागून स्लीपच्या दिशेनं गेला. सुदैवानं तो वाचला. त्यानंतर सिराजनं त्याच्याकडे पाहून काहीतरी पुटपूटले आणि स्टोक्स भडकला. सिराजचे ते षटक पूर्ण झाल्यानंतर ब्रेक दरम्यान स्टोक्स व विराट यांच्यात सिराजच्या त्या कृतीवरून शाब्दिक बाचाबाची झाली आणि अम्पायर्सना मध्यस्थी करून भांडण सोडवावं लागलं. सिराजच्या पुढील षटकात स्टोक्सनं तीन दमदार चौकार खेचून प्रत्युत्तर दिलं.
पाहा व्हिडीओ