IND Vs ENG 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना २३ फेब्रुवारीपासून (शुक्रवार) रांची येथे खेळवला जाणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी एक दिवसाआधी प्लेइंग-११ जाहीर केले आहे. विशेष म्हणजे इंग्लंडच्या प्लेइंग-११मध्ये दोन मोठे बदल पाहायला मिळाले आहेत.
फिरकी गोलंदाज रेहान अहमदच्या जागी मिस्ट्री स्पिनर शोएब बशीरचा प्लेइंग-११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. मार्क वुडच्या जागी वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनलाही प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळाले आहे. दोन स्पेशालिस्ट फिरकीपटू (हार्टली आणि बशीर) आणि दोन स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज (अँडरसन आणि रॉबिन्सन) यांच्यासह इंग्लंड चौथ्या कसोटी सामना खेळणार आहे.
चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचे प्लेइंग-XI: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.
ओली रॉबिन्सन कोण आहे?
३० वर्षीय ओली रॉबिन्स हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असून त्याने आतापर्यंत १९ कसोटी सामन्यांमध्ये ७६ बळी घेतले आहेत. रॉबिन्स प्रथमच भारतीय भूमीवर कसोटी सामना खेळणार आहे. रॉबिन्सनने याआधी भारताविरुद्ध घरच्या मैदानावर चार सामने खेळले होते, ज्यात त्याने २१ बळी घेतले होते. शोएब बशीरबद्दल बोलायचे तर तो पाकिस्तानी वंशाचा ऑफस्पिनर आहे. २० वर्षीय बशीरने सध्याच्या मालिकेदरम्यान विझाग (विशाखापट्टणम) येथे कसोटी पदार्पण केले, जिथे त्याने चार विकेट घेतल्या. बशीर यांचा जन्म इंग्लंडमधील सॉमरसेटमध्ये झाला होता. मात्र त्याचे आई-वडील पाकिस्तानी वंशाचे आहेत.
रांची कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी: २५-२९ जानेवारी, हैदराबाद (इंग्लंड २८ धावांनी विजयी)दुसरी कसोटी: २-६ फेब्रुवारी, विशाखापट्टणम (भारत १०६ धावांनी विजयी)तिसरी कसोटी: १५-१९ फेब्रुवारी, राजकोट (भारत ४३४ धावांनी विजयी)चौथी कसोटी: २३-२७ फेब्रुवारी, रांचीपाचवी कसोटी: ७-११ मार्च, धर्मशाला