Ind Vs Eng 5th T20 Live Update Score : पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli) स्वतः रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma) सलामीला आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. रोहित व विराट ही जोडी सुसाट फॉर्मात दिसली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर विराट व सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी २६ चेंडूंत ४९ धावा चोपल्या. पण, १४ व्या षटकात या भागीदारीला ब्रेक लागला. ख्रिस जॉर्डननं अविश्वसनीय झेल टिपला अन् सूर्याला माघारी जाण्यास भाग पाडले. Ind Vs Eng 5th T20, Ind Vs Eng 5th T20 Live Score ट्वेंटी-20त एकाच सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांत रोहितनं ( १०) अव्वल स्थान पटकावले. ख्रिस गेल व कॉलीन मुन्रो यांनी प्रत्येकी ९ वेळा अशी कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहित दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यानं मार्टिन गुप्तीलला मागे टाकले. रोहित व विराट या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. ९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर टीम इंडियाला पहिला धक्का बसला. बेन स्टोक्सच्या ( Ben Stokes) त्या चेंडूवर रोहितच्या बॅटची किनार लागून त्रिफळा उडाला. रोहितनं ३४ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकार खेचून ६४ धावा केल्या. ट्वेंटी-२०त पहिल्या दहा षटकांत भारतीय संघानं ८ षटकार खेचले. २०१७मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतानं ७ षटकार खेचले होते, तर २००९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १० षटकार खेचले होते. रोहित माघारी परतल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) षटकारानं डावाची सुरुवात केली. चौथ्या कसोटीतही त्यानं पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता. सूर्यकुमार व विराट यांनी आक्रमक खेळ सुरूच ठेवताना इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसे उपटली. भारतासाठी ट्वेंटी-२०त ५० षटकार मारण्याचा विक्रमही विराटनं नावावर केला. ५५ षटकारांसह रोहित अव्वल स्थानी आहे. विराट व सूर्यकुमार यांनी दुसऱ्या विकेटसाठी २६ चेंडूंत ४९ धावा चोपल्या. पण, १४ व्या षटकात या भागीदारीला ब्रेक लागला. आदिल राशिदच्या चेंडूवर सूर्यकुमारनं जोरदार फटका मारला, हा षटकार अशी खात्रीच सर्वांना होती, परंतु ख्रिस जॉर्डनं वाऱ्याच्या वेगानं धावला अन् एका हातानं झेल टिपला. सीमारेषा पार करण्यापूर्वी त्यानं चेंडू जेसन रॉयकडे फेकला अन् सूर्यकुमारला माघारी जावं लागलं. त्यानं १७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ३२ धावा केल्या.