Join us  

IND vs ENG 5th T20, Rohit and Virat : विराट कोहली-रोहित शर्मा सलामीला येणार, भारतीय संघात एक मोठा बदल

Ind Vs Eng 5th T20 Live Update Score : पाचव्या सामन्यातही नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं लागला आणि त्यांनी भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 6:40 PM

Open in App

Ind Vs Eng 5th T20 Live Update Score : पाचव्या सामन्यातही नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं लागला आणि त्यांनी भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. भारतीय संघानं चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यांत रोमहर्षक विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत २-२अशी बरोबरी मिळवली आहे. आज होणाऱ्या पाचव्या व अंतिम सामन्यात मालिकेचा निकाल आपल्या बाजूनं लावण्याच्या निर्धारानं भारत-इंग्लंड दोन्ही संघ मैदानावर उतरले आहेत. मागील चार सामन्यांत अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला ( KL Rahul) याला विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी टी नटराजनला ( T Natarajan) याला संधी दिली असून विराट कोहली ( Virat Kohli) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) सलामीला येणार आहे. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर खेळेल.  

विराट कोहली ८व्यांदा टीम इंडियासाठी सलामीला येणार आहे. जून २०१८मध्ये आयर्लंडविरुद्ध तो अखेरचा सलामीला आला होता. त्यानं सलामीवीर म्हणून ७ ट्वेंटी-20 सामन्यांत १९८ धावा केल्या आहेत. त्यात एक अर्धशतक ( ७० वि. न्यूझीलंड, २०१२) झळकावले आहे. Ind Vs Eng 5th T20, Ind Vs Eng 5th T20 Live Score

आयसीसीच्या जागतिक ट्वेंटी-२० क्रमावारीत इंग्लंडचा संघ टॉपवर आहे, तर टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण, या मालिकेत विराटनं सलामीच्या जोडीत सातत्यानं बदल केले आहेत आणि टीम इंडियाला त्याचा फायदा झालेला नाही. शिखर धवनला पहिल्या सामन्यानंतर बाकावर बसवले गेले, इशान किशनने दुसऱ्या सामन्यात पदार्पण करून अर्धशतकी खेळी केली. तिसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे इशानला विश्रांती दिली आणि रोहितनं कमबॅक केलं. चौथ्या सामन्यात  रोहित-राहुल जोडी कायम राहीली... आता पाचव्या सामन्यात विराट स्वतः सलामीला येणार आहे . Ind Vs Eng 5th T20 Live Update Score

या मालिकेतील सलामीवीरांची कामगिरी  पहिली ट्वेंटी-२० - शिखर धवन ( ४) व लोकेश राहुल ( १), भागीदारी २ धावादुसरी ट्वेंटी-२० - इशान किशन ( ५६) व लोकेश राहुल (०), भागीदारी ० धावतिसरी ट्वेंटी-२० - रोहित शर्मा ( १५) व लोकेश राहुल ( ०), भागीदारी ७ धावाचौथी ट्वेंटी-२० - रोहित शर्मा  ( १२ ) व लोकेश राहुल ( १४), भागीदारी २१ धावा

भारताची Playing XI: रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, राहुल चहर, टी नटराजन  

इंग्लंडची Playing XI : जेसन रॉय, जोस बटलर, डेवीड मलान, जॉनी बेअरस्टो, इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, मार्क वूड 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीरोहित शर्मा