Ind Vs Eng 5th T20 Live Update Score : पाचव्या ट्वेंटी-20 सामन्यात रोहित शर्मा व विराट कोहली या नव्या जोडीनं टीम इंडियाच्या धावांचा मजबूत पाया रचला. या मालिकेत आतापर्यंत भारतीय सलामीवीरांना साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यात विराटनं सातत्यानं प्रयोग केलं अन् अखेरीस आजचा त्याचा प्रयोग यशस्वी ठरला. रोहित ( Rohit Sharma) व विराट ( Virat Kohli) यांनी पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. रोहित व विराट या दोघांनी अर्धशतकी खेळी केली, तर सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) इंग्लंडच्या गोलंदाजांवर पुन्हा फटकेबाजी करताना दिसला. भारतीय फलंदाज आज इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवण्याच्या निर्धारानंच मैदानावर उतरले होते आणि त्यांनी २० षटकांत २ बाद २२४ धावा चोपून ते दाखवून दिले.
पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli) स्वतः रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma) सलामीला आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ट्वेंटी-20त एकाच सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांत रोहितनं ( १०) अव्वल स्थान पटकावले. ख्रिस गेल व कॉलीन मुन्रो यांनी प्रत्येकी ९ वेळा अशी कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहित दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. ९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर टीम इंडियाला पहिला धक्का बसला. रोहितनं ३४ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकार खेचून ६४ धावा केल्या. Ind Vs Eng 5th T20, Ind Vs Eng 5th T20 Live Score