Ind vs Eng: India Playing XI for 5th T20 : भारतीय संघानं चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यांत रोमहर्षक विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत २-२अशी बरोबरी मिळवली. आज होणाऱ्या पाचव्या व अंतिम सामन्यात मालिकेचा निकाल आपल्या बाजूनं लावण्याच्या निर्धारानं भारत-इंग्लंड दोन्ही संघ मैदानावर उतरतील. इंग्लंड प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करतील, याची शक्यता कमी आहे, परंतु टीम इंडियाला अंतिम ११मध्ये काही बदल करावे लागतील. सलामीवीर लोकेश राहुल ( KL Rahul) याचे अपयश हे संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. चारही सामन्यात राहुल अपयशी ठरला आहे आणि त्यामुळे त्याला आजच्या सामन्यात संधी न देता पदार्पणात अर्धशतक झळकावणाऱ्या इशान किशनला ( Ishan kishan) रोहित शर्मासह सलामीला खेळवावे अशी मागणी जोर धरत आहे. ( Ishan Kishan to be benched for KL Rahul?) अशात कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आजच्या सामन्यात राहुल-किशन यांच्यापैकी कुणाला संधी देतो, हे नाणेफेक झाल्यानंतरच कळेल. Ind Vs Eng 5th T20, Ind Vs Eng 5th T20 Live Score
आयसीसीच्या जागतिक ट्वेंटी-२० क्रमावारीत इंग्लंडचा संघ टॉपवर आहे, तर टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण, या मालिकेत विराटनं सलामीच्या जोडीत सातत्यानं बदल केले आहेत आणि टीम इंडियाला त्याचा फायदा झालेला नाही. शिखर धवनला पहिल्या सामन्यानंतर बाकावर बसवले गेले, इशान किशनने दुसऱ्या सामन्यात पदार्पण करून अर्धशतकी खेळी केली. तिसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे इशानला विश्रांती दिली आणि रोहितनं कमबॅक केलं. चौथ्या सामन्यात रोहित-राहुल जोडी कायम राहीली... आता पाचव्या सामन्यात विराट नवी जोडी उतरवतो का?, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. Ind Vs Eng 5th T20 Live Update Score
सूर्यकुमार यादवला दुसऱ्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली, परंतु त्याला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही, त्यानंतर त्याला रोहित शर्मासाठी बाकावर बसवण्यात आले. चौथ्या सामन्यात त्यानं पदार्पण करत अर्धशतक झळकावलं आणि आपलं स्थान पक्कं केलं. त्यामुळे लोकेश राहुल वगळता संघात बदल करण्याची गरज वाटत नाही. लोकेश राहुलनं चार सामन्यांत १, ०, ० व १४ अशा धावा केल्या आहेत. पण, त्याला विराट आणखी एक संधी देईल. अशात इशान किशनला आजही बाकावर बसावे लागेल. त्यामुळे आजच्या सामन्यात राहुल-रोहित सलामीला येतील. दोघांनाही या मालिकेत फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. Ind Vs Eng T20 Match Today, Ind Vs Eng 5th T20 Live Match
या मालिकेतील सलामीवीरांची कामगिरी पहिली ट्वेंटी-२० - शिखर धवन ( ४) व लोकेश राहुल ( १), भागीदारी २ धावादुसरी ट्वेंटी-२० - इशान किशन ( ५६) व लोकेश राहुल (०), भागीदारी ० धावतिसरी ट्वेंटी-२० - रोहित शर्मा ( १५) व लोकेश राहुल ( ०), भागीदारी ७ धावाचौथी ट्वेंटी-२० - रोहित शर्मा ( १२ ) व लोकेश राहुल ( १४), भागीदारी २१ धावा
आजच्या सामन्यातील टीम इंडियाचे संभाव्य ११ शिलेदार ( Likely Playing XI ) - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, राहुल चहर