Join us  

IND vs ENG 5th T20, Rohit Sharma : रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहली-हिटमॅनची जोडी पाहून वीरेंद्र सेहवाग म्हणतो...

IND vs ENG 5th T20 : Rohit Sharma Virender Sehwag पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli) स्वतः रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma) सलामीला आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 7:33 PM

Open in App

Ind Vs Eng 5th T20 Live Update Score : पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli) स्वतः रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma) सलामीला आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. सातत्यानं अपयशी ठरणाऱ्या लोकेश राहुलला ( KL Rahul) डच्चू देत टी नटराजनला ( T Natarajan) अंतिम ११मध्ये संधी दिली. रोहित व विराट या जोडीनं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद ६० धावा केल्या. रोहितनं दमदार फटकेबाजी करताना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्तीलला माघारी टाकून दुसरे स्थान पटकावले. Ind Vs Eng 5th T20, Ind Vs Eng 5th T20 Live Score

ट्वेंटी-२० सर्वाधिक धावाविराट कोहली - ३०९६रोहित शर्मा - २८४०*मार्टिन गुप्तील - २८३९  पाचव्या सामन्यातही नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं लागला आणि त्यांनी भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. भारतीय संघानं चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यांत रोमहर्षक विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत २-२अशी बरोबरी मिळवली आहे. मागील चार सामन्यांत अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला ( KL Rahul) याला विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी टी नटराजनला ( T Natarajan) याला संधी दिली असून विराट कोहली ( Virat Kohli) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) सलामीला आले आहेत. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर खेळेल.  Ind Vs Eng T20 Match Today, Ind Vs Eng 5th T20 Live Match

विराट-रोहित यांना सलामीला खेळताना पाहणे म्हणजे, जलेबी व रसमलाईची जोडी असं वीरूनं ट्वीट केलं. 

भारताची Playing XI: रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, राहुल चहर, टी नटराजन  

इंग्लंडची Playing XI : जेसन रॉय, जोस बटलर, डेवीड मलान, जॉनी बेअरस्टो, इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, मार्क वूड 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीरोहित शर्माविरेंद्र सेहवाग