IND vs ENG 5th T20, Rohit Sharma : रोहित शर्मा सुसाट, ९ चेंडूंत जोडल्या ४६ धावा; पण बेन स्टोक्सनं लावला ब्रेक

IND vs ENG 5th T20 : Rohit Sharma ट्वेंटी-20त एकाच सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांत रोहितनं ( १०) अव्वल स्थान पटकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 07:51 PM2021-03-20T19:51:23+5:302021-03-20T19:51:50+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 5th T20 : Rohit Sharma score 64 runs in 34 ball with 4 four and 5 sixes, break chris gayle record | IND vs ENG 5th T20, Rohit Sharma : रोहित शर्मा सुसाट, ९ चेंडूंत जोडल्या ४६ धावा; पण बेन स्टोक्सनं लावला ब्रेक

IND vs ENG 5th T20, Rohit Sharma : रोहित शर्मा सुसाट, ९ चेंडूंत जोडल्या ४६ धावा; पण बेन स्टोक्सनं लावला ब्रेक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 5th T20 Live Update Score : पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli) स्वतः रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma) सलामीला आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. रोहित व विराट ही जोडी सुसाट फॉर्मात दिसली. रोहितनं ३० चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केलं. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील त्याचे हे २६ वे अर्धशतक आहे. पण, ९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर टीम इंडियाला पहिला धक्का बसला. बेन स्टोक्सच्या ( Ben Stokes) त्या चेंडूवर रोहितच्या बॅटची किनार लागून त्रिफळा उडाला. रोहितनं ३४ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकार खेचून ६४ धावा केल्या. 

ट्वेंटी-20त एकाच सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांत रोहितनं ( १०) अव्वल स्थान पटकावले. ख्रिस गेल व कॉलीन मुन्रो यांनी प्रत्येकी ९ वेळा अशी कामगिरी केली आहे,  

ट्वेंटी-२० सर्वाधिक धावा
विराट कोहली - ३०९६
रोहित शर्मा - २८४०*
मार्टिन गुप्तील - २८३९

पाचव्या सामन्यातही नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं लागला आणि त्यांनी भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. भारतीय संघानं चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यांत रोमहर्षक विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत २-२अशी बरोबरी मिळवली आहे. मागील चार सामन्यांत अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला ( KL Rahul) याला विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी टी नटराजनला ( T Natarajan) याला संधी दिली असून विराट कोहली ( Virat Kohli) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) सलामीला आले आहेत. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर आला आणि त्यानं पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. 
 

Web Title: IND vs ENG 5th T20 : Rohit Sharma score 64 runs in 34 ball with 4 four and 5 sixes, break chris gayle record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.