Join us  

इंग्लंड-भारत पाचवी कसोटी ठरणार 'स्पेशल'; तब्बल 18 वर्षांनी जुळून येणार अनोखा योगायोग

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हा सामना खूपच खास असणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 2:39 PM

Open in App

R Ashwin Jonny Bairstow, IND vs ENG 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील धर्मशाला येथे होणारी पाचवी कसोटी मालिकेतील शेवटची कसोटी असणार आहे. इंग्लंडने मालिकेतील पहिल्या सामन्यात दमदार विजय मिळवला. त्यानंतर मात्र पुढे सलग तीन सामने भारताने जिंकले. भारतीय संघातील युवा ब्रिगेडने धडाकेबाज कामगिरी करत संघाला मालिका विजय मिळवून दिला. आता मालिकेतील शेवटचा सामना ७ जूनपासून धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना कसोटी क्रिकेटसाठी खास ठरणार आहे. यामागे कारणही तितकेच खास आहे.

भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि इंग्लंडचा दमदार फलंदाज जॉनी बेअरस्टो या दोघांसाठी हा सामना खास असणार आहे. दोन्ही खेळाडू आपापल्या देशांसाठी १००वी कसोटी खेळणार आहेत. ही कामगिरी करणारा अश्विन हा १४वा भारतीय खेळाडू ठरेल तर बेअरस्टो हा १७वा इंग्लिश खेळाडू ठरणार आहे. अश्विन आणि बेअरस्टो आपापली १००वी कसोटी एकत्र खेळणार आहेत. कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात हे दुसऱ्यांदाच घडणार आहे, जेव्हा दोन विरोधी संघातील खेळाडू एकत्र १०० कसोटी खेळण्याचा विक्रम करतील.

२००६ मध्येही घडून आला होता योगायोग

यापूर्वी २००६ मध्ये दोन संघातील खेळाडूंनी कारकिर्दीतील 100वी कसोटी एकत्र खेळली होती. सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात हा प्रकार घडला. आफ्रिकन संघातील जॅक कॅलिस आणि शॉन पोलॉक तर न्यूझीलंडच्या स्टीफन फ्लेमिंगने 100 वा कसोटी सामना एकत्र खेळला होता.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विनइंग्लंडभारतीय क्रिकेट संघ