India vs England 5th Test : रिषभ पंतच्या साथीने टीम इंडियाचा गडगडलेला डाव सावरणाऱ्या रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) इंग्लंडविरुद्धच्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शतक पूर्ण केले. मोहम्मद शमीनेही सुरेख फटके मारताना त्याला चांगली साथ दिली. 92 धावांवर असताना जडेजाचा दुसऱ्या स्लिपमध्ये झेल सुटला अन् तो चेंडू चौकार गेला. त्यानंतर आणखी एक चौकार मारून त्याने शतक पूर्ण केले. त्याचे हे कसोटीतील तिसरे शतक अन् इंग्लंडविरुद्धचे पहिलेच शतक ठरले. भारताने 7 बाद 371 धावांपर्यंत मजल मारली आहे.
रिषभ पंतने भारत-इंग्लंड पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी धुमाकुळच घातला... ट्वेंटी-20 मालिकेत थंड पडलेली रिषभची बॅट कसोटीत तळपली अन् त्याच्या 146 धावांच्या स्फोटक खेळीने सारे चित्र बदलले. भारताची अवस्था 5 बाद 98 अशी झाली होत, परंतु रिषभ व रवींद्र जडेजा यांच्या 222 धावांच्या विक्रमी भागीदारीने भारताला 7 बाद 338 धावांपर्यंत मजल मारून दिली. रिषभ-जडेजाच्या या खेळीने अनेक विक्रम मोडले गेले.