IND vs ENG: मँचेस्टरमध्ये होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीवर कोरोनाचं सावट निर्माण झालं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खेळाडूंवर आता कडक निर्बंध लागू झाले आहेत. आजचं सराव शिबीर देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच खेळाडूंना हॉटेलमधील रुममधूनही बाहेर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. (IND vs ENG 5th Test in doubt after India support staff tests positive for Covid-19)
इंग्लंडचे शिलेदार जग जिंकायला सज्ज! टी-२० वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा; मॉर्गनकडे धुरा
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर यांचा कोरोना अहवाल याआधीच पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. तिघांनाही कसोटी मालिकेपासून आता दूर ठेवण्यात आलं आहे. त्यासोबतच भारताचे फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल देखील विलगीकरणात आहेत. त्यात आता सपोर्ट स्टाफमधील आणखी एका सदस्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं चिंतेत भर पडली आहे.
भारतानं इतिहास घडवला, पण रवी शास्त्री अन् विराट कोहली यांनी ओढावून घेतली BCCIची नाराजी!
महत्त्वाची बाब अशी की संघाचे प्रशिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर संपूर्ण संघातील खेळाडूंची आणि सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी संबंधित सपोर्ट स्टाफमधील सदस्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. पण आज पुन्हा एकदा केलेल्या चाचणी संबंधित सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संघातील बहुतांश खेळाडू हे सपोर्ट स्टाफमधील सदस्यांच्या संपर्कात येत असतात त्यामुळे भारतासाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर आयपीएलचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोनाचा पुन्हा एकदा याचा परिणाम आयपीएलवर होऊ नये यासाठी बीसीसीआय देखील अलर्ट झालं आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचं आजचं सराव शिबीर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व खेळाडूंना रुमच्या बाहेर पडण्यासही मनाई करण्यात आली आहे. संघातील सहकाऱ्यांनाही खेळाडूंना भेटता येणार नाहीय.
Web Title: IND vs ENG 5th Test in doubt after India support staff tests positive for Covid 19
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.