India vs England 5th Test : नवा कर्णधार बेन स्टोक्स व नवा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी पहिल्याच मालिकेत दणका उडवला.. इंग्लंडने ३-० अशा फरकाने न्यूझीलंडवर विजय मिळवताना टीम इंडियाला धोक्याच्या इशारा दिला आहे. किवींविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडचा आक्रमक पवित्रा पाहून सारेच अवाक् झाले... जो रूट सातत्याने धावा करतोच आहे, यावेळी त्याच्या सोबतीला जॉनी बेअरस्टो, ऑली पोप, बेन स्टोक्स हेही उभे राहिले आणि धावांचा पाऊस पडला. स्टोक्स व बेअऱस्टो हे तर ट्वेंटी-२० शैलीत फटकेबाजी करताना दिसले. त्यांचा हो जोश पाहून इंग्लंडचा कर्णधार स्टोक्सने टीम इंडियाला चॅलेंज दिले. १ ते ५ जुलै या कालावधीत एडबस्टन येथे ही कसोटी होणार आहे. टीम इंडियाकडे २-१ अशी आघाडी आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडच्या फलंदाजांनी कहर केला. तिसऱ्या कसोटीत ६ बाद ५५ अशी दयनीय अवस्था असूनही बेअरस्टोच्या वादळी खेळीने किवींना नेस्तानाबूत केले. पहिल्या कसोटीत इंग्लंडने २७९ धावांचे लक्ष्य ७८.५ षटकांत पार केले, तर दुसऱ्या कसोटीत २९९ धावांचे लक्ष्य ५० षटकांत पार केले. तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने २९६ धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी ५४.३ षटकं खेळली. त्यामुळे पाचव्या कसोटीत भारतीय गोलंदाजांचा चांगलाच कस लागेल हे निश्चित दिसतंय. त्यात बेन स्टोक्सने ओपन चॅलेंज दिले आहे. मागच्या वर्षी आणि आताचा इंग्लंड संघ हा पूर्णपणे बदलला आहे आणि आम्हाला कमी लेखण्याची चूक करू नका, असे स्टोक्स म्हणाला आहे.
इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स ( कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्स, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॅवली, बेन फोक्स, जॅक लिच, अॅलेक्स लीज, क्रेग ओव्हर्टन, जेमी ओव्हर्टन, मॅथ्यू पॉट्स, ऑली पोप व जो रूट ( Ben Stokes (Durham) captain, James Anderson (Lancashire), Jonathan Bairstow (Yorkshire), Sam Billings (Kent), Stuart Broad (Nottinghamshire), Harry Brook (Yorkshire), Zak Crawley (Kent), Ben Foakes (Surrey), Jack Leach (Somerset), Alex Lees (Durham), Craig Overton (Somerset), Jamie Overton (Surrey), Matthew Potts (Durham), Ollie Pope (Surrey), Joe Root (Yorkshire)
भारताचा संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा, मयांक अग्रवाल