Join us

शुबमन गिल व जॉनी बेअरस्टो यांच्यात जुंपली, सर्फराज खानने एन्ट्री घेत बोलती बंद केली, Video 

India vs England 5th Test Live update Day 3  :  भारतीय संघाने पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 13:38 IST

Open in App

India vs England 5th Test Live update Day 3  :  भारतीय संघाने पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. भारताच्या पहिल्या डावातील २५९ धावांच्या आघाडीच्या उत्तरात इंग्लंडचा दुसरा डाव ८ बाद १६७ धावांवर गडगडला आहे. जो रूट अर्धशतक झळकावून एकटा खिंड लढवतोय. १०० वी कसोटी खेळणाऱ्या आर अश्विनने पाच विकेट्स घेऊन इंग्लंडचे कंबरडे मोडले आहे. तेच इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो याचीही ही १००वी कसोटी होती, परंतु त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या डावात त्याने आक्रमक ३९ धावा केल्या, परंतु कुलदीप यादवने त्याला माघारी पाठवले. पण, मैदानावर उभा असताना त्याच्यात व युवा फलंदाज शुबमन गिल यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचे दिसले आणि त्यात सर्फराज खान याने उडी घेतली...

 

  • जॉनी बेअरस्टो - जिम्मी थकला होता तेव्हा तू त्याला असं काय म्हणालास आणि नंतर त्याने तुला बाद केले?
  • शुबमन गिल  - त्यात काय झाले... मी १०० धावा करून बाद झालो, तू इथे किती धावा केल्यास ते सांग?
  • जॉनी बेअरस्टो - इंग्लंडमध्ये तू किती धावा केल्या होत्यास ते सांग?
  • सर्फराज खान - चुप रहने को बोल उसको. थोडे रन क्या बना दिया, ज्यादा उछल रहा है... 

 

कुलदीप यादव ( ५-७२)  व अश्विन ( ४-५१) यांनी इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर गुंडाळला. त्यानंतर रोहित शर्मा ( १०३) , शुबमन गिल ( ११०) यांची शतकं आणि यशस्वी जैस्वाल ( ५७), सर्फराज खान ( ५६) व देवदत्त पड्डिकल ( ६५) यांच्या अर्धशतकांनी इंग्लंडला झोडले. कुलदीप यादव ( ३०) व जसप्रीत बुमराह ( २०) यांनी नवव्या विकेटसाठी ४९ धावा जोडून इंग्लंडची डोकेदुखी वाढवली. भारताने पहिल्या डावात  ४७७ धावा केल्या आणि २५९ धावांची आघाडी घेतली होती

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलसर्फराज खान