India vs England Test Match Live : जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली टीम इंडिया पाचव्या कसोटीत इंग्लंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्मा कोरोनातून पूर्णपणे सावरला नसल्याने या कसोटीला तो मुकला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने मागील वर्षी भारत-इंग्लंड मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती आणि त्या मालिकेतील अखेरचा सामना आजपासून सुरू होत आहे. ३५ वर्षांनंतर भारताचा जलदगती गोलंदाज इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात नेतृत्वाची जबाबदारी पार पाडणार आहे. एडबस्टन येथे भारताची कामगिरी फार चांगली झालेली नाही, परंतु बुमराह अँड टीम इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे.. १५ वर्षापूर्वी भारताने जेव्हा इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती, तेव्हा राहुल द्रविड त्या संघाचा कर्णधार होता आणि आज तो मुख्य प्रशिक्षक आहे.
- भारताने १९३२ मध्ये पहिल्यांदा इंग्लंड दौरा केला होता
- ९० वर्षांच्या इतिहासात भारताला इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका जिंकता आलेली नाही
- भारतीय संघ सध्या या कसोटी मालिकेत २-१ असा आघाडीवर आहे, एडबस्टन येथे पाचवी कसोटी होत आहे
- भारताने २००७मध्ये येथे अखेरची कसोटी मालिका जिंकली होती, तेव्हा राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली ३ सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली होती.
भारत-इंग्लंड कसोटी मालिका २०२१-२२
- पहिली कसोटी, ट्रेंट ब्रिज - मॅच ड्रॉ
- दुसरी कसोटी, लॉर्ड्स - भारताचा १५१ धावांनी विजय
- तिसरी कसोटी, हेडींग्ले - इंग्लंडने एक डाव व ७६ धावांनी विजय
- चौथी कसोटी, ओव्हल - भारताचा १५७ धावांनी विजय
भारताचा संघ - शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स ( कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्स, स्टुअर्ट ब्रॉड, झॅक क्रॅवली, जॅक लिच, अॅलेक्स लीज, मॅथ्यू पॉट्स, ऑली पोप व जो रूट