India vs England 5th Test Live update : इंग्लंडची गाडी पाचव्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी घसरली. झॅक क्रॉलीने ७९ धावांची चांगली खेळी केली होती. पण, कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav ) पाच विकेट्स घेतल्या आणि भारताने सामन्यावर पकड घेतली. १००वी कसोटी खेळणाऱ्या आर अश्विनने ४ धक्के दिले, त्यात रवींद्र जडेजाने १ बळी टिपून इंग्लंडला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले. ३ बाद १७४ धावांवरून इंग्लंडचा संपूर्ण संघ जलदगती गोलंदाजांकडून १४ षटकं फेकून घेतल्यानंतर रोहित शर्माने फिरकीपटूंना आणले. कुलदीपने त्याच्या पहिल्याच षटकात बेन डकेटला ( २७) माघारी पाठवले. त्यानंतर कुलदीपने दुसरा धक्का देताना ऑली पोपला ( १४) यष्टिचीत केले. पहिल्या सत्रात २ धक्के मिळाल्यानंतर इंग्लंडचा डाव लंच ब्रेकनंतर थोडा स्थिरावलेला दिसला. पण, कुलदीपने अप्रतिम मारा करून त्यांची कोंडी केली. जो रूट व क्रॉली यांनी ७१ चेंडूंत ३७ धावा जोडल्या होत्या. कुलदीपने ही जोडी तोडली आणि चेंडू अप्रतिमरित्या वळवून क्रॉलीचा त्रिफळा उडवला. क्रॉलीने १०८ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह ७९ धावा केल्या. जो रूट ( २६) व जॉनी बेअरस्टो ( २९) यांची काही काळ संघर्ष दाखवला, परंतु कुलदीपने पुन्हा धक्का दिला. त्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडला... १७५ धावांवर इंग्लंडची चौथी विकेट ( बेअरस्टो ) विकेट पडली आणि ही कुलदीपची कसोटीतील पन्नासावी विकेट ठरली. मागील १०० वर्षांच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूंत ( १८७१) कसोटीत ५० विकेट्स घेणारा कुलदीप यादव हा भारताचा वेगवान आणि जगातील वेगवान फिरकीपटू ठरला. आर अश्विनने एखाच षटकात टॉम हार्टली ( ६ ) व मार्क वूड ( ०) यांना बाद केले. टी ब्रेकनंतर अश्विनने तिसरी विकेट घेताना बेन फोक्स ( २४) याचा त्रिफळा उडवला. स्वीप मारण्याच्या प्रयत्नात फोक्सच्या ग्लोव्हजला लागून चेंडू यष्टींवर आदळला. अश्विनने त्याच षटकात दुसरी विकेट घेताना इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर गुंडाळला.