James Anderson Record, IND vs ENG 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने याआधीच मालिका जिंकली आहे. इंग्लंडचा सर्वात अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनही या कसोटी सामन्याचा एक भाग आहे. या सामन्यात खेळून अँडरसनने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे.
अँडरसनने केला मोठा पराक्रम
जेम्स अँडरसन भारतात सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा परदेशी खेळाडू ठरला आहे. जेम्स अँडरसनचा भारतातील हा १७ वा कसोटी सामना आहे. अँडरसन एकाच देशात १७वा कसोटी सामना खेळत आहे, जो कोणत्याही परदेशी खेळाडूसाठी सर्वाधिक कसोटी सामना आहे. जेम्स अँडरसनच्या आधी हा विक्रम इंग्लंडच्याच डेरेक अंडरवुडच्या नावावर होता. त्याने भारतात १६ कसोटी सामने खेळले होते. अँडरसनचा सहकारी जो रूट या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. धर्मशाला कसोटी सामना खेळणाऱ्या रूटचा हा भारतातील १५वा कसोटी सामना आहे.
परदेशी खेळाडूने भारतात खेळलेले सर्वाधिक कसोटी सामने
१७- जेम्स अँडरसन*१६- डेरेक अंडरवुड१५- जो रूट*१५- व्हिव्ह रिचर्ड्स१४- कीथ फ्लेचर१४- जॉर्डन ग्रीनिज१४- क्लाईव्ह लॉईड१४- रिकी पॉन्टिंग
अँडरसन ७०० कसोटी विकेट्सच्या जवळ
४१ वर्षीय अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक टप्पा गाठण्यापासून फक्त २ विकेट दूर आहे. जर अँडरसनने धरमशाला येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात २ विकेट्स घेतल्यास तो जगातील एकमेव वेगवान गोलंदाज असेल आणि कसोटी क्रिकेटमध्ये ७०० बळींचा आकडा गाठणारा तो पहिला असेल. आतापर्यंत फक्त दोनच गोलंदाज आहेत ज्यांनी ७०० किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेतले आहेत आणि दोघेही फिरकीपटू आहेत. मुथय्या मुरलीधरन (८०० विकेट) आणि शेन वॉर्न (७०८ विकेट). मात्र, वेगवान गोलंदाजाला अद्याप हे जमलेले नाही.