Ind vs Eng Live test Match : इंग्लंडच्या ओपनर्सची शतकी भागीदारी; निराश होऊ नका चौथ्या कसोटीचा रिझल्ट आठवा  

Ind Vs Eng test Match live : भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रॅवली व अॅलेक्स लीज यांनी उल्लेखनीय सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 08:05 PM2022-07-04T20:05:28+5:302022-07-04T20:05:43+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : 100 from 19.5 ov (Lees 54, Crawley 45); England was 100 for 0 while chasing 368 runs in the 4th Test but lost the match by 157 runs last year  | Ind vs Eng Live test Match : इंग्लंडच्या ओपनर्सची शतकी भागीदारी; निराश होऊ नका चौथ्या कसोटीचा रिझल्ट आठवा  

Ind vs Eng Live test Match : इंग्लंडच्या ओपनर्सची शतकी भागीदारी; निराश होऊ नका चौथ्या कसोटीचा रिझल्ट आठवा  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng test Match live : भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रॅवली व अॅलेक्स लीज यांनी उल्लेखनीय सुरुवात केली. लीजने कसोटीतील दुसरे अर्धशतक पूर्ण करताना ७-८च्या सरासरीने इंग्लंडच्या धावांचा वेग कायम राखला. क्रॅवली व लीज यांची फटकेबाजी पाहून भारतीय चाहते निराश नक्की झाले असतील, परंतु त्यांनी याच मालिकेतील चौथी कसोटी आठवा. त्याही वेळेस अशाच परिस्थितीतून भारताने पुनरागमन केले होते. नवा चेंडू हाती येताच जसप्रीत बुमराह पुन्हा गोलंदाजीला आला अन् त्याने क्रॅवलीचा त्रिफळा उडवला, इंग्लंडला १०७ धावांवर पहिला धक्का बसला. 

MS Dhoni लाही जे जमले नाही ते रिषभ पंतने केले; १९७३, १९५० सालचे अनेक विक्रम मोडले

टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ २८४ धावांत तंबूत परतला. १३२ धावांची आघाडी घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या डावात साजेशी सुरुवात करता आली नाही. शुबमन गिल ( ४), हनुमा विहारी ( ११) व  विराट कोहली (२०) माघारी परतले. चेतेश्वर व रिषभ यांनी ७८ धावांची भागीदारी करून डाव सावरला. पुजारा १६८ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ६६ धावांवर माघारी परतला, तर रिषभनेही ८६ चेंडूंत ५७ धावा केल्या. श्रेयस अय्यर ( १९) पुन्हा अपयशी ठरला. त्यानंतर भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर आटोपला अन् इंग्लंडसमोर ३७८ धावांचे लक्ष्य ठेवले गेले.  

एडबस्टन येथे २००८मध्ये दक्षिण आफ्रिकेने २८३ धावांचे लक्ष्य पार केले होते आणि ही येथील सर्वोत्तम कामगिरी आहे. इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रॅवली व अॅलेक्स लीज यांनी उल्लेखनीय सुरुवात केली.  रवींद्र जडेजाने टाकलेल्या १५व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर झॅक क्रॅवलीसाठी जोरदार अपील झाले. जडेजाच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जागच्याजागी उडाला अन्   शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या हनुमा विहारीने झेल घेतला. भारतीय खेळाडूंनी जल्लोषाला सुरूवात केली, परंतु अम्पायर अलीम दार यांनी त्यांना थांबण्यास सांगितले. Soft Signel आऊट देऊन त्याने तिसऱ्या अम्पायरची मदत घेतली. त्यात  चेंडू बॅटची किनार घेत त्याच्याच बुटांवर आदळण्यापूर्वी जमिनीवर टप्पा घेते असल्याचे दिसले. इंग्लंडच्या ओपनर्सनी २० षटकांत शतकी भागीदारी पूर्ण केली आहे. 

काय झाले होते चौथ्या कसोटीत?
भारताचा पहिला डाव १९१ धावांवर गुंडाळल्यानंतर इंग्लंडला २९० धावाच करता आल्या. पण, भारताने दुसऱ्या डावात रोहित शर्मा ( १२७), लोकेश राहुल ( ४६), चेतेश्वर पुजारा ( ६१), विराट कोहली ( ४४), रिषभ पंत ( ५०) व शार्दूल ठाकूरच्या ( ६०) खेळीच्या जोरावर ४६६ धावा चोपल्या. ३६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचे ओपनर्स रोरी बर्न्स ( ५०) व हसीब हमीद ( ६३) यांनी पहिल्या विकेटसाठी १०० धावा केल्या. पण, बर्न्स माघारी परतला अन् बघता बघता इंग्लंडचा  संपूर्ण संघ २१० धावांत तंबूत परतला. भारताने १५७ धावांनी ही मॅच जिंकली. उमेश यादवने तीन, तर जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या होत्या. 

Web Title: Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : 100 from 19.5 ov (Lees 54, Crawley 45); England was 100 for 0 while chasing 368 runs in the 4th Test but lost the match by 157 runs last year 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.