Joe Root, Ind vs Eng Live test Match : दोन DRS वाया घालवली अन् कॅच सोडली, तिथेच मॅच गेली; जॉनी बेअरस्टो व जो रूट या जोडीनं मॅच खेचून आणली

कसोटीतील नंबर वन फलंदाज जो रूट ( Joe Root) व भन्नाट फॉर्मात असलेल्या जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांनी दमदार खेळ करताना टीम इंडियाच्या हातून सामना खेचून आणला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 10:29 PM2022-07-04T22:29:15+5:302022-07-04T22:29:52+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : After surviving two reviews and a dropped catch, Joe Root and Jonny  Bairstow have now left England with less than 200 runs to win | Joe Root, Ind vs Eng Live test Match : दोन DRS वाया घालवली अन् कॅच सोडली, तिथेच मॅच गेली; जॉनी बेअरस्टो व जो रूट या जोडीनं मॅच खेचून आणली

Joe Root, Ind vs Eng Live test Match : दोन DRS वाया घालवली अन् कॅच सोडली, तिथेच मॅच गेली; जॉनी बेअरस्टो व जो रूट या जोडीनं मॅच खेचून आणली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng test Match live : बिनबाद १०७ वरून इंग्लंडची अवस्था ३ बाद १०९ झाली अन् टीम इंडियाने कमबॅकच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. पण, कसोटीतील नंबर वन फलंदाज जो रूट ( Joe Root) व भन्नाट फॉर्मात असलेल्या जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांनी दमदार खेळ करताना टीम इंडियाच्या हातून सामना खेचून आणला. मोहम्मद शमी  व रवींद्र जडेजा यांच्या गोलंदाजीवर जो रूटला LBW करण्यासाठी घेतलेले DRS ही वाया गेले आणि त्याचा फटका पुढील षटकात बसला. त्यात बेअरस्टो १४ धावांवर असताना हनुमा विहारीने दिलेले जीवदान महागात पडले. या दोघांनी शतकी भागीदारी करताना इंग्लंडला ३ बाद १०९ वरून ३ बाद २०९ धावांपर्यंत पोहोचवले आहे. रुटने ५५वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. 


पहिल्या डावात ५ बाद ९८ वरून ४१६ धावांपर्यंत मजल मारणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या डावात २४५ धावा करता आल्या. इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गुंडाळून भारताने पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी ३७८ धावांचे लक्ष्य ठेवले गेले. भारताच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा ( ६६) व रिषभ पंत (५७) यांनी अर्धशतक झळकावले. इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रॅवली व अॅलेक्स लीज यांनी उल्लेखनीय सुरुवात केली.  इंग्लंडच्या ओपनर्सनी २० षटकांत शतकी भागीदारी पूर्ण केली आहे. बुमराहने पहिला धक्का दिला. त्याने क्रॅवलीचा त्रिफळा उडवला. टी ब्रेकनंतर बुमराहने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना ओली पोपला माघारी पाठवले. जॉनी बेअरस्टो व लीज यांच्यातील ताळमेळ चुकले अन् लीजला ५६ धावांवर रन आऊट होऊन माघारी परतावे लागले.  

जो रूट  व जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडचा डाव सावरताना चांगला खेळ केला. रुट नेहमीपेक्षा आज अधिक वेगाने धावा करताना दिसला. दरम्यान, बेअरस्टोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडला. त्यात हनुमा विहारीने इंग्लंडच्या बेअरस्टोला १४ धावांवर जीवदान दिले. रूटने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक २४३२* धावा करणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूचा  मान पटकावताना अॅलिस्टर कूकला ( २४३१) मागे टाकले. रूट व बेअरस्टो यांची विकेट मिळवण्यासाठी भारताने दोन DRS ही वाया घालवले. इंग्लंडची ही अनुभवी जोडी सहज धावा जमवत होत्या आणि भारताचे क्षेत्ररक्षण पाहून त्यांच्याकडून धावा अडवण्याचेही प्रयत्न झालेले दिसले नाही. रुटने ७१ चेंडूंत कसोटीतील ५५ वे अर्धशतक पूर्ण केले. 




कसोटीतील नंबर १ फलंदाज रूटने भारतीय गोलंदाजांना हतबल केले  होते.  रूट व बेअरस्टोने शतकी भागीदारी केली आणि इंग्लंडला ३ बाद २१४ धावांपर्यंत पोहोचवले आहे. आता इंग्लंडला विजयासाठी १६४ धावा करायच्या आहेत. 

Web Title: Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : After surviving two reviews and a dropped catch, Joe Root and Jonny  Bairstow have now left England with less than 200 runs to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.