Ind Vs Eng test Match live : बिनबाद १०७ वरून इंग्लंडची अवस्था ३ बाद १०९ झाली अन् टीम इंडियाने कमबॅकच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. पण, कसोटीतील नंबर वन फलंदाज जो रूट ( Joe Root) व भन्नाट फॉर्मात असलेल्या जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांनी दमदार खेळ करताना टीम इंडियाच्या हातून सामना खेचून आणला. मोहम्मद शमी व रवींद्र जडेजा यांच्या गोलंदाजीवर जो रूटला LBW करण्यासाठी घेतलेले DRS ही वाया गेले आणि त्याचा फटका पुढील षटकात बसला. त्यात बेअरस्टो १४ धावांवर असताना हनुमा विहारीने दिलेले जीवदान महागात पडले. या दोघांनी शतकी भागीदारी करताना इंग्लंडला ३ बाद १०९ वरून ३ बाद २०९ धावांपर्यंत पोहोचवले आहे. रुटने ५५वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले.
जो रूट व जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडचा डाव सावरताना चांगला खेळ केला. रुट नेहमीपेक्षा आज अधिक वेगाने धावा करताना दिसला. दरम्यान, बेअरस्टोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडला. त्यात हनुमा विहारीने इंग्लंडच्या बेअरस्टोला १४ धावांवर जीवदान दिले. रूटने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक २४३२* धावा करणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूचा मान पटकावताना अॅलिस्टर कूकला ( २४३१) मागे टाकले. रूट व बेअरस्टो यांची विकेट मिळवण्यासाठी भारताने दोन DRS ही वाया घालवले. इंग्लंडची ही अनुभवी जोडी सहज धावा जमवत होत्या आणि भारताचे क्षेत्ररक्षण पाहून त्यांच्याकडून धावा अडवण्याचेही प्रयत्न झालेले दिसले नाही. रुटने ७१ चेंडूंत कसोटीतील ५५ वे अर्धशतक पूर्ण केले.