Ind Vs Eng test Match live : चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या विकेटनंतर भारताला दोन धक्के बसले. रवींद्र जडेजाला जीवदान मिळाले आहे आणि आता त्याच्यावरच इंग्लंडसमोर मोठे आव्हान उभं करण्याची जबाबदारी आहे. पुजारा व रिषभ यांच्या वैयक्तिक अर्धशतकांमुळे भारताने तीनशेपार आघाडी नेली आहे. श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. यावेळी त्याला बाद करण्यासाठी इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम ( Brendon McCullum ) याने मदत केली. ड्रेसिंग रूममधून त्याने खुणवा खुणवी केली अन् गोलंदाज मॅथ्यू पॉट्स याने रणनीती बदलली अन् भारताची विकेट पडली.
MS Dhoni लाही जे जमले नाही ते रिषभ पंतने केले; १९७३, १९५० सालचे अनेक विक्रम मोडले
टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ २८४ धावांत तंबूत परतला. १३२ धावांची आघाडी घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या डावात साजेशी सुरुवात करता आली नाही. शुबमन गिल ( ४), हनुमा विहारी ( ११) व विराट कोहली (२०) माघारी परतले. चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी ७८ धावांची भागीदारी करून डाव सावरला. पुजारा १६८ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ६६ धावांवर माघारी परतला, तर रिषभनेही ८६ चेंडूंत ५७ धावा केल्या.
श्रेयस अय्यर ( १९) पुन्हा अपयशी ठरला. त्याला बाद करण्यासाठी मॅक्युलमने गोलंदाजांना शॉर्ट बॉल टाकण्याचा इशारा केला होता आणि त्यानुसार पॉट्सने गोलंदाजी केली व जेम्स अँडरसनने सोपा झेल घेतला. शार्दूल ठाकूर ४ धावांवर माघारी परतल्याने भारताची अवस्था ७ बाद २२० झाली आहे आणि त्यांच्याकडे ३५२ धावांची आघाडी आहे.
या सामन्यात रिषभने पहिल्या डावात १४६ आणि दुसऱ्या डावात ५७ अशा एकूण २०३ धावा करून विक्रम केला. भारताबाहेर एकाच कसोटीत २००+ धावा करणारा तो भारताचा पहिला यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. इंग्लंडविरुद्ध एकाच कसोटीत शतक व अर्धशतक अशी खेळी करणारा तो दुसरा भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. यापूर्वी १९७३ मध्ये फारूख इंजिनियर्स यांनी मुंबईत झालेल्या कसोटीत १२१ व ६६ धावा केल्या होत्या. इंग्लंडमध्ये परदेशी यष्टिरक्षक-फलंदाजाने २००+ धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी १९५०मध्ये वेस्ट इंडिजच्या क्लाईड वॅलकॉट यांनी लॉर्ड्स कसोटीत १४+१६८* अशा एकूण १८२ धावा केल्या होत्या.
Web Title: Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Brendon McCullum straightaway told England to go for the short ball tactic against Shreyas Iyer, he goes for 19 Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.