Jonny Bairstow Century, Ind vs Eng Live test Match : जो रूटपाठोपाठ जॉनी बेअरस्टो कोपला, भारतीय गोलंदाजांना चांगलाच चोपला; मोठा विक्रम केला

Ind Vs Eng test Match live : जो रूट  ( Joe Root) याच्यापाठोपाठ जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यानेही शतक झळकावून इंग्लंडचा विजय पक्का केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 04:27 PM2022-07-05T16:27:53+5:302022-07-05T16:28:11+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Century! Jonny Bairstow brings up second ton in the match and his sixth Test of 2022. He becomes 3rd English batter to slam ton in both the innings of a Test match.   | Jonny Bairstow Century, Ind vs Eng Live test Match : जो रूटपाठोपाठ जॉनी बेअरस्टो कोपला, भारतीय गोलंदाजांना चांगलाच चोपला; मोठा विक्रम केला

Jonny Bairstow Century, Ind vs Eng Live test Match : जो रूटपाठोपाठ जॉनी बेअरस्टो कोपला, भारतीय गोलंदाजांना चांगलाच चोपला; मोठा विक्रम केला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng test Match live : जो रूट  ( Joe Root) याच्यापाठोपाठ जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यानेही शतक झळकावून इंग्लंडचा विजय पक्का केला आहे. बिनबाद १०७ वरून ३ बाद १०९ अशी अवस्था असताना रूट-बेअरस्टो जोडी मैदानावर आली अन् भारतीय गोलंदाजांचा पालापाचोळा केला. १९९१नंतर इंग्लंडसाठी चौथ्या डावात द्विशतकी भागीदारी करणारी ही पहिली जोडी ठरली. रुटने कसोटीतील २८ वे शतक झळकावले, विशेष म्हणजे मागील १८ महिन्यांतील त्याचे हे ११ वे शतक ठरले. बेअरस्टोनेही १३८ चेंडूंत शतक पूर्ण केले. या सामन्यातील त्याचे हे दुसरे शतक ठरले, तर एकंदर ११ वे...इंग्लंडच्या मैदानावर दोन्ही डावांत शतक झळकावणारा बेअरस्टो १२वा फलंदाज ठरला.  


भारताच्या पहिल्या डावातील ४१६ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गडगडला. १३२ धावांची आघाडी मिळवूनही भारताला दुसऱ्या डावात साजेशी कामगिरी करता आली नाही. चेतेश्वर पुजारा ( ६६) व रिषभ पंत ( ५७) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने २४५ धावांपर्यंत मजल मारली आणि इंग्लंडसमोर ३७८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात ते यशस्वी झाले. भारताच्या ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जॅक क्रॅवली ( ४६) व अॅलेक्स लीज ( ५६)  यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या अन् मजबूत पाया रचला. त्यानंतर भारताने २ धावांच्या अंतराने तीन विकेट्स घेत कमबॅक केले.

 
पण, जो रूट व जॉनी बेअरस्टो यांनी २०० धावांची भागीदारी करून सामना फिरवला व विक्रमाला गवसणी घातली. बेअरस्टोला १४ धावांवर दिलेले जीवदान महागात पडले. आर्टन आणि गूच यांनी १९९१ मध्ये चौथ्या डावात इंग्लंडसाठी द्विशतकी भागीदारी केली होती आणि त्यानंतर आज हा पराक्रम झाला. कसोटी क्रिकेटमध्ये रुटने २८ वे शतक झळकावून स्टीव्ह स्मिथ व विराट कोहली यांना ( २७ शतकं) मागे टाकले. जानेवारी २०२१नंतर रुटचे हे ११ वे कसोटी शतक ठरले. भारताविरुद्ध सर्वाधिक ९ शतकं करणारा रुट हा जगातील पहिला फलंदाज ठरला. शिवाय ग्रॅहम गूच यांच्यानंतर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत ७००+ धावा करणाराही तो पहिला फलंदाज ठरला. 
 

Web Title: Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Century! Jonny Bairstow brings up second ton in the match and his sixth Test of 2022. He becomes 3rd English batter to slam ton in both the innings of a Test match.  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.