Ind Vs Eng test Match live : जो रूट ( Joe Root) याच्यापाठोपाठ जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यानेही शतक झळकावून इंग्लंडचा विजय पक्का केला आहे. बिनबाद १०७ वरून ३ बाद १०९ अशी अवस्था असताना रूट-बेअरस्टो जोडी मैदानावर आली अन् भारतीय गोलंदाजांचा पालापाचोळा केला. १९९१नंतर इंग्लंडसाठी चौथ्या डावात द्विशतकी भागीदारी करणारी ही पहिली जोडी ठरली. रुटने कसोटीतील २८ वे शतक झळकावले, विशेष म्हणजे मागील १८ महिन्यांतील त्याचे हे ११ वे शतक ठरले. बेअरस्टोनेही १३८ चेंडूंत शतक पूर्ण केले. या सामन्यातील त्याचे हे दुसरे शतक ठरले, तर एकंदर ११ वे...इंग्लंडच्या मैदानावर दोन्ही डावांत शतक झळकावणारा बेअरस्टो १२वा फलंदाज ठरला.
पण, जो रूट व जॉनी बेअरस्टो यांनी २०० धावांची भागीदारी करून सामना फिरवला व विक्रमाला गवसणी घातली. बेअरस्टोला १४ धावांवर दिलेले जीवदान महागात पडले. आर्टन आणि गूच यांनी १९९१ मध्ये चौथ्या डावात इंग्लंडसाठी द्विशतकी भागीदारी केली होती आणि त्यानंतर आज हा पराक्रम झाला. कसोटी क्रिकेटमध्ये रुटने २८ वे शतक झळकावून स्टीव्ह स्मिथ व विराट कोहली यांना ( २७ शतकं) मागे टाकले. जानेवारी २०२१नंतर रुटचे हे ११ वे कसोटी शतक ठरले. भारताविरुद्ध सर्वाधिक ९ शतकं करणारा रुट हा जगातील पहिला फलंदाज ठरला. शिवाय ग्रॅहम गूच यांच्यानंतर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत ७००+ धावा करणाराही तो पहिला फलंदाज ठरला.