Cheteshwar Pujara, Ind vs Eng Live test Match : चेतेश्वर पुजारा आऊट झाला, पण भारताचा विजय निश्चित केला; १४ वर्षांपूर्वीची जादू होणे अशक्य... 

Ind Vs Eng test Match live : रोहित शर्मा व लोकेश राहुल हे दोन्ही सलामीवीर या सामन्याला मुकल्यानंतर  चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) याने ही जबाबदारी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 03:44 PM2022-07-04T15:44:38+5:302022-07-04T15:45:04+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Cheteshwar Pujara 66 valuable runs in the second innings, 281 is highest successful Test run chase at Edgbaston; India current lead - 284 | Cheteshwar Pujara, Ind vs Eng Live test Match : चेतेश्वर पुजारा आऊट झाला, पण भारताचा विजय निश्चित केला; १४ वर्षांपूर्वीची जादू होणे अशक्य... 

Cheteshwar Pujara, Ind vs Eng Live test Match : चेतेश्वर पुजारा आऊट झाला, पण भारताचा विजय निश्चित केला; १४ वर्षांपूर्वीची जादू होणे अशक्य... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng test Match live : रोहित शर्मा व लोकेश राहुल हे दोन्ही सलामीवीर या सामन्याला मुकल्यानंतर  चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) याने ही जबाबदारी घेतली. त्याने हनुमा विहारी ( ३९), विराट कोहली ( ३२) व रिषभ पंत ( ७८) यांच्यासह टीम इंडियाचा विजय आता पक्का केला आहे. चेतेश्वर पुजारा १६८ चेंडूंत ८ चौकारांसह ६६ धावांवर माघारी परतला. पण, टीम इंडियाने घेतलेली मजबूत आघाडी ओलांडणे अशक्य आहे. त्यासाठी इंग्लंडला २००८ साली दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या जादूची पुनरावृत्ती करावी लागेल. 

टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ २८४ धावांत तंबूत परतला. तिसऱ्या दिवशी जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्स ( २५) यांनी सहाव्या विकेटसाठी ७५ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी केली. बेअरस्टो व सॅम बिलिंग्स यांनी ४९ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. बेअरस्टो १४० चेंडूंत १४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०६ धावांवर बाद झाला. भारताने पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेतली. मोहम्मद सिराज ( ४-६६), जसप्रीत बुमराह ( ३-६८), मोहम्मद शमी ( २-७८) व शार्दूल ठाकूर ( १-४८) या जलदगती गोलंदाजांनी भारताला आघाडी मिळवून दिली. 

भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात फार चांगली झाली नाही. शुबमन गिल ( ४), हनुमा विहारी ( ११) व  विराट कोहली (२०) माघारी परतले. चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी भारताचा डाव सावरला आहे. पुजाराने १३९ चेंडूंचा सामना करताना इंग्लंडमधील त्याचे पाचवे अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे कसोटीतील ३३ वे अर्धशतक ठरले. दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर रिषभ पंतला जीवदान मिळाले. भारताने दिवसअखेर ३ बाद १२५ धावा करताना २५७ धावांची आघाडी घेतली होती. एडबस्टन येथे ३६ वर्षांनंतर कसोटीत अर्धशतक झळकावणारा पुजारा हा भारताचा पहिला सलामीवीर ठरला. सुनील गावस्कर यांनी १९८६ साली येथे ५४ धावा केल्या होत्या. 


भारताच्या ४ बाद १६७ धावा झाल्या आहेत आणि त्यांच्याकडे २९९ धावांची आघाडी घेतली आहे. एडबस्टन येथे आतापर्यंत चौथ्या डावात २८१ धावांचे यशस्वी लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने पार केले होते. त्यामुळे आता इथून भारताला नमवणे इंग्लंडसाठी अवघड आहे. 

Web Title: Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Cheteshwar Pujara 66 valuable runs in the second innings, 281 is highest successful Test run chase at Edgbaston; India current lead - 284

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.