Ind vs Eng Live test Match : रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा यांचे अर्धशतक; टीम इंडियाने यजमानांसमोर ठेवले तगडे लक्ष्य 

Ind Vs Eng test Match live : चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या अर्धशतकाने भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 06:14 PM2022-07-04T18:14:04+5:302022-07-04T18:14:39+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : England need 378 runs to mark a historic Test victory and level the series 2-2. | Ind vs Eng Live test Match : रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा यांचे अर्धशतक; टीम इंडियाने यजमानांसमोर ठेवले तगडे लक्ष्य 

Ind vs Eng Live test Match : रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा यांचे अर्धशतक; टीम इंडियाने यजमानांसमोर ठेवले तगडे लक्ष्य 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng test Match live : चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या अर्धशतकाने भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली. ही दोघं माघारी परतल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी झटपट शेपूट गुंडाळले. रवींद्र जडेजाला जीवदान मिळाले, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याच्यासोबतीला उभं राहणारा फलंदाजच कुणी नव्हता.  पहिल्या डावातील १३२ धावांच्या आघाडीच्या जोरावर भारताने यजमानांसमोर तगडे लक्ष्य उभे करण्यात यश मिळवले आहे. इंग्लंडमध्ये १९४८ नंतर ते आतापर्यंत एवढ्या धावांच्या लक्ष्याचा कुणालाच पाठलाग करता आलेला नाही.

टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ २८४ धावांत तंबूत परतला. १३२ धावांची आघाडी घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या डावात साजेशी सुरुवात करता आली नाही. शुबमन गिल ( ४), हनुमा विहारी ( ११) व  विराट कोहली (२०) माघारी परतले. चेतेश्वर व रिषभ यांनी ७८ धावांची भागीदारी करून डाव सावरला. पुजारा १६८ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ६६ धावांवर माघारी परतला, तर रिषभनेही ८६ चेंडूंत ५७ धावा केल्या. श्रेयस अय्यर ( १९) पुन्हा अपयशी ठरला. शार्दूल ठाकूर ४ धावांवर माघारी परतला. 

लंच ब्रेकनंतर मोहम्मद शमी ( १३) झेलबाद झाला. त्यानंतर बेन स्टोक्सने आणखी एक धक्का देताना जडेजाला ( २३)  धावांवर बाद केले. चेंडू बॅटची किनार घेत यष्टींवर आदळला अन् भारताची नववी विकेट पडली. जसप्रीत बुमराहची ( ७) विकेट घेत स्टोक्सने भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर गुंडाळला. इंग्लंडसमोर विजयासाठी ३७८ धावांचे लक्ष्य आहे. इंग्लडमध्ये १८८०नंतर ३५०+ धावांच्या लक्ष्याचा केवळ दोनवेळा यशस्वी पाठलाग झाला आहे. ऑस्ट्रेलियाने १९४८मधये ३ बाद ४०४ आणि इंग्लंडने २०१९मध्ये ९ बाद ३६२ धावांचे लक्ष्य पार केले. 
 

Web Title: Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : England need 378 runs to mark a historic Test victory and level the series 2-2.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.