Rishabh Pant, IND vs ENG Live 5th Test Match : रिषभ पंतचे अर्धशतक; मोडला सचिन तेंडुलकर, सुरेश रैना यांनाही न जमलेला विक्रम, Video

India vs England Test Match Live : ५ बाद ९८ अशा कचाट्यात सापडलेल्या टीम इंडियाच्या मदतीला रिषभ पंत ( Rishabh Pant) व रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) ही जोडी धावून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 08:43 PM2022-07-01T20:43:46+5:302022-07-01T20:54:07+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 5th Test Match Live Scorecard : half-century from Rishabh Pant, he becomes the youngest Indian to hit 100 international sixes, Video  | Rishabh Pant, IND vs ENG Live 5th Test Match : रिषभ पंतचे अर्धशतक; मोडला सचिन तेंडुलकर, सुरेश रैना यांनाही न जमलेला विक्रम, Video

Rishabh Pant, IND vs ENG Live 5th Test Match : रिषभ पंतचे अर्धशतक; मोडला सचिन तेंडुलकर, सुरेश रैना यांनाही न जमलेला विक्रम, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England Test Match Live : ५ बाद ९८ अशा कचाट्यात सापडलेल्या टीम इंडियाच्या मदतीला रिषभ पंत ( Rishabh Pant) व रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) ही जोडी धावून आली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ५०+ भागीदारी करताना इंग्लंडला बॅकफूटवर फेकले. रिषभने त्याच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत फटकेबाजी केली आणि सुरेश रैना व सचिन तेंडुलकर यांचा मोठा विक्रम मोडला. आतापर्यंत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम त्याने केला. रिषभने ५१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत गिल व पुजारा ही जोडी ओपनिंगला आलेली. गिलचे सुरेख फटके पाहून ही जोडी कमाल करेल असे वाटले होते, परंतु इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने धक्के दिले. त्याने गिलला १७ धावांवर माघारी पाठवले, त्यानंतर पुजारालाही १३ धावांवर बाद केले.  हनुमा विहारी सावध खेळत होता. पण, २३व्या षटकात मॅथ्यू पॉट्सने त्याला ( २०) पायचीत केले.  २५व्या षटकाच्या दुसरा चेंडू खेळावा की सोडावा या संभ्रामवस्थेत विराट गेला. तो बॅट मागे घेणार त्याआधीच चेंडू बॅटवर आदळून यष्टींवर आदळला. विराट १९ चेंडूंत ११ धावांवर बाद झाला आणि भारताला  ७१ धावांवर चौथा धक्का बसला. अँडरसनने दिवसाची तिसरी विकेट घेताना श्रेयस अय्यरला ( १५) बाद केले. भारताचा निम्मा संघ ९८ धावांवर तंबूत परतला. बिलिंग्सने डाव्याबाजूने जाणाऱ्या चेंडूवर झेप घेत श्रेयसची विकेट मिळवून दिली. 

रिषभ पंतरवींद्र जडेजा या डावखुऱ्या जोडीने खिंड लढवताना ५५ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जॅक लिच याला रिषभने टार्गेट करताना तुफान फटकेबाजी केली. वयाच्या २४व्या वर्षी भारताकडून १०० षटकार खेचणारा रिषभ पहिला फलंदाज ठरला. सुरेश रैना ( ९९) व सचिन तेंडुलकर ( ९८) यांचा विक्रम त्याने मोडला. भारताकडून १०० आंतरराष्ट्रीय षटकार खेचणारा रिषभ हा युवा फलंदाज ठरला. रैनाने २५ वर्ष व ७७ दिवसांचा असताना ९९ षटकार खेचले होते, तर तेंडुलकरने २५ व्या वर्षी ९८ षटकार नावावर केले होते.

वयाच्या २४व्या वर्षांपर्यंत SENA देशांत कसोटीत सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये रिषभने ( ७) दुसरे स्थान पटकावताना दिलीप वेंगसरकर ( ६) यांचा विक्रम मोडला. तेंडुलकर ( ११) अव्वल स्थानावर आहे.  

Web Title: IND vs ENG 5th Test Match Live Scorecard : half-century from Rishabh Pant, he becomes the youngest Indian to hit 100 international sixes, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.