India vs England Test Match Live : पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-इंग्लंड कसोटीच्या पहिल्या दिवसाचा लंच ब्रेक २० मिनिटे आधी घेतला गेला आहे. शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा ही नवी सलामीची जोडी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देतानाचे चित्र असतानाच जेम्स अँडरसनने धक्के दिले. पुजारा-हनुमा विहारी या जोडीने बचावात्मक खेळ सुरू ठेवला होता आणि ही जोडी तोडण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने गोलंदाजीत बदल केले. त्यामुळेच इंग्लंडच्या खेळाडूंनी पुजाराची विकेट ढापण्याचा प्रयत्न केला आणि पाकिस्तानी अम्पायर अलिम दार ( Aleem Dar) यांनीही त्यांना मदत केली. Ind vs Eng Live scorecard
जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली टीम इंडिया पाचव्या कसोटीत इंग्लंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गिल व पुजारा यांनी सकारात्मक सुरूवात केली. गिलने काही सुरेख फटके मारून इंग्लंडच्या ताफ्यात धास्ती निर्माण केली. ही जोडी आता इंग्लंडच्या गोलंदाजांना जुमानत नाही, असे वाटत असतानाच घात झाला. जेम्स अँडसरसनच्या आऊट स्वींग चेंडूवर गिल १७ धावांवर स्लिपमध्ये झेलबाद झाला. पुजारा व हनुमा विहारी यांनी भारताचा डाव सावरला होता. विहारी सुरूवातीला चाचपडला, परंतु सेट झाल्यानंतर तो चिटकून बसला.. Ind vs Eng 5th match livescore
पुजाराने DRS घेतला अन्...
१४व्या षटकांत स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर पुजारासाठी जोरदार अपील झाले. चेंडू यष्टीरक्षक सॅम बिलिंग्सच्या हाती विसावण्यापूर्वी बॅडशी संपर्क झाल्याचा दावा केला गेला अन् अम्पायर अलीम दार यांनीही बाद दिले. पण, पुजाराने त्वरित रिव्ह्यू घेतला अन् त्याच चेंडू व थायपॅड यांचा संपर्क झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिसऱ्या अम्पायरने LBW साठी तपासणी केली, परंतु त्यातही चेंडू यष्टींवरून जात असल्याचे दिसले अन् अलिम दार यांना निर्णय बदलावा लागला.
मात्र, जेम्स अँडरसनने भारताला दुसरा धक्का देताना पुजाराला ( १३) स्लिपमध्ये झेलबाद केले. ४६ धावांवर भारताने दोन्ही सलामीवीर गमावले. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. अँडरसनने कसोटीत सर्वाधिक १२ वेळा पुजाराची विकेट घेतली आहे.
Web Title: IND vs ENG 5th Test Match Live Scorecard : India 53/2 on Day 1 Lunch, Cheteshwar Pujara is given out caught behind to Broad off an inside edge, but it's successfully reviewed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.