IND vs ENG Live 5th Test Match : James Anderson ने टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर माघारी पाठवले, भन्नाट गोलंदाजी पाहून सारेच खूश झाले, Video 

IND vs ENG 5th Test Match Live Scorecard : शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा ही नवी जोडी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देतानाचे चित्र असतानाच जेम्स अँडरसनने ७व्या षटकात धक्का दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 04:36 PM2022-07-01T16:36:04+5:302022-07-01T16:36:40+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 5th Test Match Live Scorecard : James Anderson gets both the Indian openers - Cheteshwar Pujara & shubman Gill - India 46 for 2, Video  | IND vs ENG Live 5th Test Match : James Anderson ने टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर माघारी पाठवले, भन्नाट गोलंदाजी पाहून सारेच खूश झाले, Video 

IND vs ENG Live 5th Test Match : James Anderson ने टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर माघारी पाठवले, भन्नाट गोलंदाजी पाहून सारेच खूश झाले, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England Test Match Live : शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा ही नवी जोडी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देतानाचे चित्र असतानाच जेम्स अँडरसनने ७व्या षटकात धक्का दिला. गिल ४ चौकारांच्या मदतीने १७ धावा करून माघारी परतला. त्यानंतर पुजारा-हनुमा विहारी या जोडीने बचावात्मक खेळ सुरू ठेवला आहे. ही जोडी तोडण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने गोलंदाजीत बदल केले, परंतु वाट्याला यश काही आले नाही. मात्र, पाकिस्तानी अम्पायर अलिम दार ( Aleem Dar) यांनी पुजाराला बाद दिले होते. पण, पुजाराने त्वरीत DRS घेतला अन् तो नाबाद ठरला. पण, त्याचा फार फायदा झाला नाही. 

जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली टीम इंडिया पाचव्या कसोटीत इंग्लंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने मागील वर्षी भारत-इंग्लंड मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती आणि त्या मालिकेतील अखेरचा सामना सुरू आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गिल व पुजारा यांनी सकारात्मक सुरूवात केली. गिलने काही सुरेख फटके मारून इंग्लंडच्या ताफ्यात धास्ती निर्माण केली. ही जोडी आता इंग्लंडच्या गोलंदाजांना जुमानत नाही, असे वाटत असतानाच घात झाला. जेम्स अँडसरसनच्या आऊट स्वींग चेंडूवर गिल १७ धावांवर स्लिपमध्ये झेलबाद झाला. गिलच्या खेळीत चार चौकारांचा समावेश होता.


पुजारा व हनुमा विहारी यांनी भारताचा डाव सावरला आहे. विहारी सुरूवातीला चाचपडला, परंतु सेट झाल्यानंतर तो चिटकून बसला.. १४व्या षटकांत स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर पुजारासाठी जोरदार अपील झाले. चेंडू यष्टीरक्षक सॅम बिलिंग्सच्या हाती विसावण्यापूर्वी बॅडशी संपर्क झाल्याचा दावा केला गेला अन् अम्पायर अलीम दार यांनीही बाद दिले. पण, पुजाराने त्वरित रिव्ह्यू घेतला अन् त्याच चेंडू व थायपॅड यांचा संपर्क झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, जेम्स अँडरसनने भारताला दुसरा धक्का देताना पुजाराला ( १३) स्लिपमध्ये झेलबाद केले. ४६ धावांवर भारताने दोन्ही सलामीवीर गमावले...


 

Web Title: IND vs ENG 5th Test Match Live Scorecard : James Anderson gets both the Indian openers - Cheteshwar Pujara & shubman Gill - India 46 for 2, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.