Ind Vs Eng test Match live : भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रॅवली व अॅलेक्स लीज यांनी उल्लेखनीय सुरुवात केली. पण, नवा चेंडू हातात येताच जसप्रीत बुमराहनं ( Jasprit Bumrah) धडाधड दोन विकेट्स घेतल्या. सलामीवीर क्रॅवली याने बुमराहने टाकलेला भन्नाट चेंडू सोडण्याची चूक केली आणि त्याला काही कळण्याआधीच त्याचा त्रिफळा उडाला... त्यानंतर ऑली पोपलाही ( ०) बाद करून इंग्लंडला १०७ धावांवर दोन धक्के दिले.
टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ २८४ धावांत तंबूत परतला. चेतेश्वर पुजारा १६८ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ६६ धावांवर माघारी परतला, तर रिषभ पंतनेही ८६ चेंडूंत ५७ धावा केल्या. भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर आटोपला अन् इंग्लंडसमोर ३७८ धावांचे लक्ष्य ठेवले गेले. एडबस्टन येथे २००८मध्ये दक्षिण आफ्रिकेने २८३ धावांचे लक्ष्य पार केले होते आणि ही येथील सर्वोत्तम कामगिरी आहे. इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रॅवली व अॅलेक्स लीज यांनी उल्लेखनीय सुरुवात केली.
इंग्लंडच्या ओपनर्सनी २० षटकांत शतकी भागीदारी पूर्ण केली आहे. लीजने कसोटीतील दुसरे अर्धशतक पूर्ण करताना ७-८च्या सरासरीने इंग्लंडच्या धावांचा वेग कायम राखला. नवा चेंडू हाती येताच जसप्रीत बुमराह पुन्हा गोलंदाजीला आला अन् त्याने क्रॅवलीचा त्रिफळा उडवला, इंग्लंडला १०७ धावांवर पहिला धक्का बसला. टी ब्रेकनंतर बुमराहने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना ओली पोपला माघारी पाठवले.
क्रॅवलीच्या विकेटसह बुमराहने SENA देशांत ( South Africa, England, New Zealand & Australia) १०० कसोटी विकेट्स पूर्ण केल्या. त्याने इंग्लंडमध्ये ( ३७), ऑस्ट्रेलियात ( ३२), दक्षिण आफ्रिकेत ( २६) व न्यूझीलंडमध्ये ( ६) विकेट्स घेतल्या आहेत. असा पराक्रम करणारा तो सहावा भारतीय गोलंदाज आहे. अनिल कुंबळे ( १४१), इशान शर्मा ( १३०) , जहीर खान ( ११९), मोहम्मद शमी ( ११९), कपिल देव ( ११७) यांनी हा पराक्रम केला आहे.
Web Title: Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Jasprit Bumrah gets the opening breakthrough, what a ball by the captain, becomes 6th Indian bowler to take 100 Test wickets on SENA, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.